आवृत्ती पुणे
← Back to Homepage

“मन वचन काया“ ची शुध्दता जीवन जगण्याची उत्तम कला – साध्वी सुमनप्रभाजी

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta, MJW - Social News, MJW Daily News(Post Slider), Other, People, Social • January 16, 2024

आकुर्डी : मकर संक्रांतिचे औचित्य साधत आकुर्डी-निगडी-प्राधिकरण श्री संघाद्वारे मंगल प्रवचन व महामांगलीक चे आयोजन करण्यात आले होते. उप प्रवर्तनी ओजस्वी वक्ता प. पू. श्री सुमनप्रभाजी म. सा., प. पू. श्री स्वर्णश्रीजी म. सा., प. पू. चंद्रयशाजी म. सा., प.पू. देशनाजी म. सा., प. पू. देवेंद्रप्रभाजी, म. सा., प. पू. विभाश्रीजी म. सा. आदि ठाणा ६ च्या सानिध्यात व पिंपरी चिंचवड़ येथील जैन समाजाच्या मान्यवरांच्या उपस्थितीत समारोह संपन्न झाला. प. पु. स्वर्णश्रीजी म.सा. द्वारा “लोग्गस” या मंत्राचा जाप करण्यात आला व उपप्रवर्तिनी खानदेश रत्ना महासाध्वी प. पु. सुमनप्रभाजीं म.सा. यांनी मकर संक्रांतिचे महत्व विशद करणारे मंगलमय प्रवचन सांगितले. कार्यकमाचे समापन महासाध्वी पु. सुमनप्रभाजींच्या मंगलकारी महामांगलीक ने करण्यात आले. संघाध्यक्ष सुभाष ललवाणी यांनी महासाध्वींचे व उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले व जवाहर मुथा यांनी सर्वांचे आभार मानले.

get_footer();