मोटारसायकलवरुन मोबाईल चोरी करणाऱ्या चोरटयांच्या आवळल्या मुसक्या
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : पुणे शहरातील पायी जाणाऱ्या नागरिकांचे मोपेड मोटारसायकल वरुन मोबाईल चोरी करणाऱ्या चोरटयांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.
गेल्या काही दिवसात मोबाईल चोरीचे प्रमाण वाढले आहे. हनुमान मंदिराजवळ पर्वती पायथा रस्त्यावरून पायी जाणाऱ्या रस्त्याने पायी जात असताना पाठीमागुन तपकीरी (मरुन) रंगाचे सुझुकी बर्गमॅन या दुचाकी वरून आलेल्या दोन मुलांनी फिर्यादी यांचे हातातील मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावुन घेवुन चोरुन नेला होता.
दाखल गुन्हयाचा पोलीस अंमलदार प्रकाश मरगजे व पोलीस मित्र दिनेश परीहार यांनी तांत्रीक तपास करुन दाखल गुन्हयात शादाब मेहबुब सय्यद (वय २२ वर्षे रा. वाडकरमळा, मोमिन दवाखान्या समोर, सय्यद नगर, हडपसर पुणे) त्या त्याचा अल्पवयीन साथीदार यांच्या कडुन एकुण ०८ मोबाईल फोन व बर्गमॅन मोपेड मोटार सायकल जप्त केली आहे.
फरासखाना, खडक, विश्रामबाग, मुंढवा, व इतर भागातुन मोबाईल चोरी केल्याची कबुली आरोपींनी दिली आहे. या परिसरातूनकोणाचे मोबाईल फोन चोरी गेले असतील तर त्यांनी पर्वती पोलीस स्टेशन येथे संपर्क करावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
आरोपींना पकडण्याची कामगीरी पोलीस उप आयुक्त परि-३. संभाजी कदम, सहा. पोलीस आयुक्त सिंहगडरोड विभाग पुणे शहर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक सचिन पवार, पोलीस अंमलदार प्रकाश मरगजे, कुंदन शिंदे, अमित चिव्हे, सूर्या जाधव, अनिस तांबोळी, दयानंद तेलंगे- पाटील, अमोल दबडे, सद्दाम शेख, यांनी केली आहे.
