राजेश गोयल यांचा राज्यपालांच्या हस्ते गौरव
महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल
पुणे : पुण्यातील ‘कोहिनूर ग्रुप’चे सह व्यवस्थापकीय संचालक राजेश कृष्णकुमार गोयल यांना बांधकाम क्षेत्रात अतुलनीय योगदान दिल्याबद्दल राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते मुंबईत बिझनेस एक्सलन्स अॅवार्ड देऊन गौरवण्यात आले. नवभारत के शिल्पकार २०२४ या कार्यक्रमात नवभारताच्या निर्मितीसाठी योगदान दिल्याबद्दल हा गौरव करण्यात आला.
