आवृत्ती पुणे
← Back to Homepage

विलास राठोड यांची राष्ट्रीय मंत्रीपदी निवड

पुणे : पुणे येथील विलास राठोड यांची श्री ऑल इंडिया श्वेतांबर स्थानकवासी जैन कॉन्फरन्स, नवी दिल्लीच्या राष्ट्रीय कार्यकारिणी समितीत “राष्ट्रीय मंत्री” पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. ही निवड कार्यकाल 2025-27 साठी करण्यात आली आहे.

श्री ऑल इंडिया श्वेतांबर स्थानकवासी जैन कॉन्फरन्स, नवी दिल्लीच्या नियमांनुसार, स्थानकवासी जैन परंपरेला उज्ज्वल ठेवणाऱ्या या मातृसंस्थेच्या राष्ट्रीय समितीत विलास राठोड यांची निवड करण्यात आली आहे.

राष्ट्रीय अध्यक्ष अतुल जैन यांनी त्यांना ही नियुक्ती पत्राद्वारे दिली असून, त्यांच्या प्रतिभा, प्रतिष्ठा आणि सेवाभावनेद्वारे कॉन्फरन्सच्या धार्मिक, सामाजिक व मानवकल्याणाच्या कार्यांना अधिक बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.

get_footer();