आवृत्ती पुणे
← Back to Homepage

सोलापूर जिल्हयातुन 2 आरोपी तडीपार

सोलापूर : आगामी लोकसभा निवडणुक -2024 च्या अनुषंगाने सोलापूर तालुका, पोलीस ठाणेच्या कार्यक्षेत्रात सार्वजनिक शांतता अबाधित राखण्यासाठी नंदु उर्फ नंदकुमार चव्हाण उर्फ राजपुत (रा.हिरज ता.उत्तर सोलापूर जि.सोलापूर) याच्या विरूध्द हद्दपार करण्याचा प्रस्ताव उपविभागीय दंडाधिकारी सोलापूर यांच्याकडे सादर करण्यात आला होता.

या आरोपीविरुद्ध सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, मारामारी करून गंभीर दुखापत करणे, अवैधरित्या दारूची विक्री करणे अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत.

तसेच महेश उर्फ बबलु पौळ (रा.हगलुर ता.उत्तर सोलापूर) याच्या विरूध्द देखील हद्दीपार करण्याचा प्रस्ताव उपविभागीय दंडाधिकारी सोलापूर यांच्याकडे सादर करण्यात आला होता.

या आरोपीविरूध्द पोलीस ठाण्यात मारहाण करणे, महिला विषयक जबरी चोरी व अनुसुचित जाती जमाती अत्याचार असे एकूण 7 गुन्हे दाखल आहेत.
या दोघांनाही उपविभागीय दंडाधिकारी सोलापूर यांच्याकडे पाठविलेल्या प्रस्तवाच्या अनुषंगाने आदेशाच्या दिनांकापासुन दिनांक 31मे पर्यंत सोलापूर, सांगली व धाराशिव या जिल्हयातुन तडीपार केले आहे.

यापुढेही ज्यांच्या विरूध्द 2 पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत अशा आरोपीचे गुन्हेगारी पडताळुन त्याच्याविरूध्द हद्दपार करण्याचे कामकाज सुरू असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर, यांनी सांगितले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक, नामदेव शिंदे, यांच्या नेतृत्वाखाली तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक सूरज निंबाळकर, पोहवा मियॉवाले, पोलीस अंमलदार पैंगबर नदाफ तसेच हिरज बीट मधील कार्यरत असलेल्या पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी पार पाडली आहे.

get_footer();