आवृत्ती पुणे
← Back to Homepage

हळदीकुंकू कार्यक्रमाला महिलांचा भरभरून प्रतिसाद

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta, MJW - Social News, MJW Daily News(Post Slider), Other, People, Social • January 22, 2024

गौतम लब्धी फाऊंडेशन, शांती नगर परिसर महिला विंगचा उपक्रम

पुणे: प. पु. गुरूदेव श्री प्रविणॠषीजी म. सा. यांच्या प्रेरणेने सुरू झालेल्या गौतम लब्धी फाऊंडेशन या समाजसेवी संस्थेच्या शांतीनगर परिसर महिला विंग अध्यक्षा डॉ. अंकिता लोढा आणि त्यांच्या संपुर्ण महिला विंग तर्फे परिसरातील राजयोग लाॅन येथे भव्य दिव्य हळदीकुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

जास्त महिलांनी आपली उपस्थिती लावली. यानिमित्ताने तुषार पिंगळे प्रेझेंट्स ‘द मेलेडियन जर्नी’ या नाविन्यपूर्ण आर्केष्ट्राचे आयोजन करण्यात आले होते. या दरम्यान सर्व महिलांनी हळदीकुंकू, तिळगूळ समारंभ साजरा केला. याचसोबत आर्केष्ट्राचा आनंद लुटत स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला. हा कार्यक्रमसाठी प्रमुख पाहुणे म्हणून राजश्री पारख, वृषाली कामठे, संगीता ठोसर, रंजना टिळेकर, संध्या टिळेकर, सेजल कटारिया, मनीषा नहाटा, सतीष सुराणा, अनिल नहार, ॲड. नितीन संकलेचा, संतोष ललवाणी, दिलीप कटारिया, सिद्धार्थ भटेवरा, गौतम नाबरीया, डॉ. सागर लोढा, निलेश कोठारी यांच्या प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमासाठी सर्व महिला विंग कार्यकारिणी बबिता खाटेर, वर्षा ओस्तवाल, सपना छाजेड, राजश्री गुगळे, मिनल डुंगरवाल, अंकिता शिंगवी, कल्पना कटारिया, सीमा रूणवाल, मयूरी बेदमुथा, स्नेहल बोरा, वर्षा चोपड़ा यांनी परिश्रम घेतले व त्याच बरोबर गौतम लब्धी फाऊंडेशन शांतीनगरचे अध्यक्ष गोकुळ रूणवाल, सचिव दिलीप गुगळे, सदस्य अभिजित डुंगरवाल, वर्धमान छाजेड, तुषार संकलेचा यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अल्पना कटारिया यांनी केले. या कार्यक्रमासाठी उद्योगपती नितीन चोरडिया, विकी संघवी, राज ट्रेंडीग कंपनी, पोपटलाल कांकरीया, स्वराज राहुल कर्णावट, शंकर चौधरी, सेजल कटारिया, बनवारी महाराज, दुगड ग्रुप, संगीता बोथरा, सायस फार्मा, गौतम निधी सेंटर कमिटी यांनी सहकार्य केले.

get_footer();