आवृत्ती पुणे
← Back to Homepage

१८ ठिकाणी छापे टाकून २१ जणांना घेतले ताब्यात

पुणे : पुणे शहरात ई सिगारेट, वेब व तंबाखुजन्य फ्लेवर विक्रेत्यावर शुक्रवारी (7 जुलै) पुणे पोलिसांनी धडक कारवाई करत तब्बल १८ ठिकाणी छापे टाकून २१ जणांना ताब्यात घेतले आहे.

शहरातील तरुणाई मोठ्या प्रमाणात व्यसनाकडे वळत असल्याने पोलीस आयुक्त अमितेशकुमार, सह पोलीस आयुक्त प्रविण पवार, अपर पोलीस आयुक्त( गुन्हे). शैलेश बलकवडे यांनी पुणे शहरातील ई सिगारेट व वेब याची विक्री करणारे यांची माहिती काढुन त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

त्याप्रमाणे पोलीस उप आयुक्त ( गुन्हे )अमोल झेंडे, मा सुनिल तांबे, सहा पो आयुक्त, गुन्हे १, व सतिश गोवेकर, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे २ यांचे मार्गदर्शनाखाली पुणे शहर गुन्हे शाखे कडील सर्व युनिटचे अधिकारी व अंमलदार यांची पथके तयार करुन दिवसभर विशेष अभियान राबवले.

पुणे शहरामध्ये ई सिगारेट, वेब व तंबाखुजन्य फ्लेवर यांची विक्री करणारे एकुण १८ वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करुन एकुण २१ आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडुन एकुण १०,६७,५९४/- रक्कमेची ई सिगारेट, वेब तसेच तंबाखुजन्य फ्लेवर जप्त करण्यात आले.

सिगारेट व अन्य तंबाखुजन्य उत्पादने (महाराष्ट्र सुधारणा) अधिनियम २०१८ चे कलम ७ (२), २० (२) प्रमाणे कारवाई करण्यात आलेली आहे. शहरातकारवाई मध्ये सातत्य ठेवुन ई सिगारेट, वेब, तंबाखुजन्य फ्लेवर यांची विक्री करणारे यांचे समुळ उच्चाटण करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

get_footer();