आवृत्ती पुणे
← Back to Homepage

१२ वर्षीय मुलीने बलात्कार करण्याचा प्रयत्न करणाऱ्याला चोपले

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • December 31, 2021

हडपसर-काळेपडळमधील घटना : एक अटकेत, अल्पवयीनाला घेतले ताब्यात

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : मैत्रिणीचे प्रेमप्रकरण घरी सांगितल्याने 16 वर्षाच्या मुलाने हात कापून घेतला असल्याचे सांगून एका 12 वर्षाच्या मुलीला जबरदस्तीने आपल्या रुमवर बोलावून घेऊन तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न करणार्‍या २८ वर्षाच्या नराधमाला या मुलीने बहादुरी दाखवत चांगलाच धडा शिकवला. त्याला हाताने व लाथाबुक्क्यांनी मारुन अंगावरुन खाली पाडले व स्वत:ची सुटका करुन घेतली. या घटनेची माहिती मिळाल्यावर हडपसर पोलिसांनी तातडीने या नराधमाचा शोध घेऊन त्याला अटक केली. हडपसरमधील काळेपडळ येथे 28 डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजता घडली होती.

प्रशांत ऊर्फ गोट्या प्रकाश थिट्टे (वय 28, रा. काळेपडळ, हडपसर) असे या नराधमाचे नाव आहे. त्याच्याबरोबर सहभागी 16 वर्षाच्या मुलाला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी 12 वर्षाच्या मुलीने हडपसर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी सांगितले की, काळेपडळ येथील 12 वर्षाच्या मुलीला एका 16 वर्षाच्या मुलाने तुला मारुन टाकीन, तुला कोयत्याने कापून टाकीन, अशी धमकी दिली. या मुलीला त्याचे मेसेज तिच्या मैत्रिणीला देण्यास सांगत असे. 28 डिसेबर रोजी प्रशांत थिट्टे याने या मुलीला गाठले. तू या मुलाचे व तुझ्या मैत्रिणीबाबत घरी का सांगितले, त्यामुळे किती प्रॉब्लेम झाला आहे. या मुलाने हात कापला असून, तो रडत आहे. त्याचे खरे खोटे करण्यासाठी रुमवर ये असे सांगितले. त्याला तिने नकार दिल्यावर त्याने तिला मारहाण करुन जबरदस्तीने आपल्या रुमवर नेले. रुममध्ये गेल्यावर दाराला कडी लावून तिला बेडरुममध्ये नेले. तिला बेडवर ढकलून तिच्यावर तो जबरदस्ती करु लागला. तेव्हा या 12 वर्षाच्या मुलीने त्याला प्रतिकार केला. सर्व शक्ती एकवटून त्याला हाताने व लाथांनी मारले.

त्यामुळे प्रशांत बेडवरुन खाली पडला. तेव्हा या मुलीने कडी काढून घेऊन तेथून बाहेर पळ काढला. आपल्या घरी जाऊन आईला ही हकीकत सांगितली. तिला घेऊन तिची आई या आरोपीच्या घराकडे येत असतानाच तो पळून गेला. त्यांनी तातडीने हडपसर पोलिसांकडे धाव घेतली. या घटनेची माहिती मिळताच हडपसर पोलिसांनी तातडीने आरोपीचा शोध घेतला, तर तो कात्रज परिसरात असून पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तात्काळ प्रशांत थिट्टे व 16 वर्षाच्या अल्पवयीन मुलाला कात्रज येथून ताब्यात घेतले. सहायक पोलीस निरीक्षक गायकवाड तपास करीत आहेत.

get_footer();