आवृत्ती पुणे
← Back to Homepage

सुखसागरनगरमध्ये चोरी करणारा जेरबंद

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • September 28, 2021

बिबवेवाडी पोलिसांची कामगिरी : सीसीटीव्ही फुटेज आणि सूत्रांकडून मिळाली माहिती

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : सीसीटीव्हीचे फुटेज आणि सूत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे एकाला जेरबंद करून दोन लाख ५२ हजार ५०० रुपयांचा ऐवज जप्त केला. बिबवेवाडी पोलिसांच्या तपास पथकाने कारवाई केली.

मोन्या ऊर्फ हरिष कैलास गौड (वय २४, रा. डाके चौक, सुखसागरनगर, कात्रज, पुणे) असे अटक करून त्याच्याकडून ३३ ग्रॅम सोन्याचे दागिने व ॲक्टिवा, मारुती इको कार असा एकूण दोन लाख ५२ हजार ५०० रुपये किंमतीचा ऐवज हस्तगत केला.

पोलिसांनी सांगितले की, बिबवेवाडी पोलीस स्टेशनअंतर्गत सुखसागरनगर येथे तीन लाख ४७ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने, घड्याळ व रोख रक्कम चोरीला गेला. तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास केला गुन्ह्यातील आरोपी वर्षा ऊर्फ वरुण विनोद चव्हाण (वय २४, रा. परामंद चाळ, शास्त्रीनगर, वांद्रापाड, अंबरनाथ प., ता. जि. ठाणे, मोन्या ऊर्फ हरिष कैलास गौड (वय २४, रा. डाके चौक, सुखसागरनगर, कात्रज, पुणे, मूळ अहमदाबाद, शेषपूर टॉवर, राधेशाम मंदिराजवळ, जि. अहमदाबाद, राज्य. गुजरातचे असल्याचे निष्पन्न झाले. आरोपीचा शोध घेत असताना वर्षा ऊर्फ वरुण विनोद चव्हाण हा आधारवाडा मध्यवर्ती कारागृह, अंबरनाथ, जि. ठाणे येथे अटकेत असल्याचे समजले. त्याला ताब्यात घेऊन त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे आरोपीला अटक करून त्याच्याकडून ३३ ग्रॅम सोन्याचे दागिने व त्याने चोरलेली एक होंडा ॲक्टिवा मोपेड, तसेच मारुती इको चारचाकी कार असा एकूण दोन लाख ५२ हजार ५०० रुपये किमतीचा सोने व वाहने असा मुद्देमाल हस्तगत केला.

पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र गलांडे, बिबवेवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील झावरे, पोलीस निरीक्षिका अनिता हिवरकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक राजेश उसगावकर, सहायक पोलीस उपनिरीक्षक दीपक मते, पोलीस अंमलदार श्रीकांत कुलकर्णी, अमित पुजारी, सतीश मोरे, तानाजी सागर, अतुल महांगडे, राहुल शेलार यांच्या पथकाने ही कारवाई केली.

get_footer();