आवृत्ती पुणे
← Back to Homepage

१३ वर्षांपूर्वी बेपत्ता झालेला इसम कुटुंबीयांच्या स्वाधीन

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • September 3, 2021

पुणे लोहमार्ग पोलिसांची कामगिरी : कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर आनंदाचे उधाण

पुणे : महाराष्ट्र न्यूज 360 नेटवर्क

पुणे लोहमार्ग पोलिसांनी १३ वर्षांपूर्वी मिसिंग झालेल्या इसमाचा शोध घेऊन कुटुंबीयांच्या स्वाधीन केल्यावर, कुटुंबीयांच्या चेहऱ्यावरील आनंद गगनात मावत नव्हता.

दिनांक ०८/०५/२००८ रोजी झेलम एक्स्प्रेस गाडीने प्रवास करीत असलेले इसम गणेश मन्नुलाल यादव ( वय २६) हा प्रवास करीत असताना तो पुणे रेल्वे स्टेशन येथून मिसिंग झालेबाबत तक्रारदार सुशीलकुमार मन्नुलाल यादव ( वय २५, रा. मु.पो. हिनोतीया भोई, ता. बरेला, जि. जबलपुर, मध्यप्रदेश) यांनी दिलेल्या तक्रारीवरून पुणे लोहमार्ग पोलीस ठाणे येथे मनुष्य मिसिंगअन्वये दाखल करण्यात आली होती.

पोलीस अधीक्षक, लोहमार्ग पुणे सदानंद वायसे-पाटील यांच्या आदेशान्वये मिसिंग मनुष्यांचा शोध घेणेकामी पुणे लोहमार्ग पोलीस ठाणे येथे एक स्वतंत्र पथक स्थापन करण्यात आले आहे.

पुणे लोहमार्ग पोलीस ठाण्याकडील मनुष्य मिसिंगचा तपास करीत असताना यातील पथक अहोरात्र मेहनत घेऊन मिसिंग झालेल्या इसमांचा शोध घेत होते. त्याप्रमाणे यातील मिसिंग इसम गणेश मन्नुलाल यादव हा आर्जन मित्तल अँड निप्पो स्टील प्लॉन्ट कन्व्हेअर या कंपनीत सुरत येथे काम करीत असल्याची माहिती प्राप्त झाली. त्यानंतर तपासपथकाने सदर मिसिंग इसमास ताब्यात घेऊन गुरुवारी (ता. २ सप्टेंबर) त्यास पुणे लोहमार्ग पोलीस ठाणे येथे त्याचे भाऊ नामे सुशीलकुमार मन्नुलाल यादव यांच्या ताब्यात दिले. सदर बाबत नातेवाईकांनी पोलिसांचे आभार मानून समाधान व्यक्त केले आहे.

get_footer();