आवृत्ती पुणे
← Back to Homepage

गैरसमजातून दुकान पेटवून देणार्‍या चौघांवर गुन्हा दाखल

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • February 3, 2022

हडपसर-भाजी मंडईतील घटना : तुझी वाट लावतो अशी दिली होती धमकी

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : हप्ते न भरल्याने फायनान्स कंपनीने मोटारसायकल जप्त केली. तरुणाने सांगितल्यामुळे कंपनीने गाडी नेली असा गैरसमज करुन चौघांनी हडपसर भाजी मंडईतील दुकानाला आग लावल्याचा प्रकार समोर आला आहे. या आगीत भाजीपाला व फळाचे दोन दुकाने तसेच शेजारील तीन दुकानांचे नुकसान झाले आहे.

याप्रकरणी मयुर किसन फडतरे (वय ३२, रा. रामोशी आळी, हडपसर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन राज चौधरी, रौफ बागवान, अर्जुन ऊर्फ टोण्या व फैज्या आणि बागवान लातुरी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी व आरोपी राज चौधरी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. राज चौधरी याने मयुर याच्या नावावर एक मोटारसायकल खरेदी केली. मात्र, त्याने हप्ते न भरल्याने फायनान्स कंपनीने त्यांची मोटारसायकल नेली होती. परंतु, आरोपी यांना फिर्यादी यांनीच फायनान्सवाल्यांना गाडी दिली असल्याचा गैरसमज झाला. त्यांनी फिर्यादी यांच्यासोबत वाद घालून फिर्यादी याला तुझी वाट लावतो, अशी धमकी दिली होती. फिर्यादी यांचे हडपसर भाजी मंडई येथे भाजीपाला व फळाचे दोन दुकाने आहेत. आरोपींनी त्या दुकानांना ३१ जानेवारी रोजी रात्री आग लावली. त्यात त्यांच्या दोन दुकानांबरोबर शेजारील चंद्रकला गवळी, अक्षय भिसे व धोंडाबाई पांढरे यांच्या दुकानाला आग लागली. त्यात ६० हजार रुपयांचे नुकसान झाले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

get_footer();