आवृत्ती पुणे
← Back to Homepage

आशियातील पहिला मोफत फिरता दवाखाना

maharashtra jain warta • Maharashtra News Networks, MNN - Daily News(Post Slider), MNN - Social News, Other, People, Social • January 15, 2024

आरोग्यमंत्री सावंत यांच्या संकल्पनेतून चालू

भूम : आरोग्यमंत्री .प्रा. डॉ.तानाजीराव सावंत यांच्या संकल्पनेतून आशियातील पहिला मोफत फिरता दवाखाना शिबिर मौजे बऱ्हाणपूर ता. भूम जि.धाराशिव येथे आयोजित करण्यात आले आहे.

या फिरता दवाखाना या गाडीचे मंत्रिमहोदय यांचे आरोग्यदूत पांडुरंग धस, सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, आशासेविका, अंगणवाडी सेविका, समस्त ग्रामस्थ व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पूजा करून तपासणीला सुरुवात झाली. या फिरत्या दवाखान्यामध्ये एक्स रे, बीपी, शुगर, कॅन्सर, डोळे तपासणी, गुडघे, याच्या व्यतिरिक्त जो कोणता आजार असेल त्या प्रत्येक आजाराची तज्ञ डॉक्टर कडून मोफत तपासणी करण्यात येणार आहे व रुग्णांना मोफत गोळ्या औषधे देण्यात येणार आहेत. एवढंच नाही तर महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा डॉ तानाजीराव सावंत यांच्यासारखा असा संवेदनशील लोकप्रतिनिधी आपल्याला आमदार म्हणून लाभला, याबद्दल गावकऱ्यामध्ये चर्चा, व सर्वसामान्य जनतेच्या चेहऱ्यावर समाधान स्पष्ट दिसत होत .

get_footer();