आवृत्ती पुणे
← Back to Homepage

17 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणारा अटकेत

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • December 11, 2021

सिंहगड रोड पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद : ‘माझे दाजी नगरसेवक आहेत, तुझ्या खानदानाला जगू देणार नाही’ !

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : अल्पवयीन मुलीला धमकी देत ब्लॅकमेल करून अत्याचार करणाऱ्यास अटक केली आहे. ‘माझे दाजी नगरसेवक आहेत, तुला आणि तुझ्या खानदानाला जगू देणार नाही’, असे धमकावून व ब्लॅकमेल करुन एका १७ वर्षाच्या युवकाने त्याच्याच वयाच्या अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार धायरी येथे २० जून २०२० पासून आतापर्यंत सुरु होता.

याप्रकरणी अल्पवयीन मुलीच्या आईने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी यांच्या १७ वर्षाच्या अल्पवयीन मुलीची उत्तमनगर येथील १७ वर्षाच्या मुलाबरोबर ओळख होती. त्याने या मुलीला धमकावून व ब्लॅकमेल करुन तिच्यावर वारंवार बलात्कार केला. त्यानंतर ही मुलगी त्याच्याशी बोलत नव्हती. तेव्हा त्याने तू ऐवढे दिवस माझ्याशी बोलली नाहीस, तुला माझ्याशी बोलावेच लागेल. आपल्यात सर्व काही झालेले आहे. तुला माझ्याशीच लग्न करावे लागेल. नाही तर माझे दाजी नगरसेवक आहेत. तुला आणि तुझ्या खानदानाला जगू देणार नाही,” अशी धमकी दिली. या प्रकारानंतर तिने हे सर्व आपल्या आईला सांगितले. त्यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली.

पोलिसांनी या मुलाला अटक केली असून सहायक पोलीस निरीक्षक तांदळे तपास करीत आहेत.

get_footer();