आवृत्ती पुणे
← Back to Homepage

दि पूना मर्चंट्‌स चेंबरच्या अध्यक्षपदी रायकुमार नहार

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta, MJW - Social News, MJW Daily News(Post Slider), News Slider, Other, Social • December 29, 2023

नव्या कार्यकारिणीची बिनविरोध निवड

पुणे : अमृतमहोत्सवी वारसा लाभलेल्या दि पूना मर्चेंटस् चेंबरच्या अध्यक्षपदी व्यापार विश्वातील जाणकार व्यक्तिमत्त्व रायकुमार नहार यांची निवड झाली असनू, उपाध्यक्षपदी अजित बोरा, सचिवपदी ईश्वर नहार आणि सहसचिवपदी आशीष दुगड यांची निवड झाली आहे. नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडी बिनविरोध झाल्या.

दि पूना मर्चटस् चेंबर ही भुसार बाजारातील व्यापाऱ्यांची राज्यातील सर्वांत जुनी आणि नावाजलेली संस्था आहे. चेंबरची द्वैवार्षिक निवडणूक नुकतीच बिनविरोध झाली. मावळते अध्यक्ष राजेंद्र बाठिया, अजित बोरा, रायकुमार नहार, ईश्वर नहार, नवीन गोयल, उत्तम बाठिया, आशीष दुगड, दिनेश मेहता, मुकेश छाजेड, महिपालसिंह राजपुरोहित, संजय चोरबेले, विजय मुथा, कुणाल ओस्तवाल, मुकेश गोयल व सचिन रायसोनी या सर्व सदस्यांची बिनविरोध निवड झाली. नवनिर्वाचित सदस्यांची पहिली सभा शुक्रवारी झाली. यावेळी नव्या कार्यकारिणीची एकमताने निवड करण्यात आली.
दि पूना मर्चेंटस् चेंबरच्या सर्व माजी अध्यक्षांची एक सल्लागार समिती स्थापन करण्यात आली असून त्यांच्या मार्गदर्शनाचा चेंबरच्या भूमिकेमध्ये समावेश होणार आहे. कार्यकारी मंडळावर स्वीकृत सदस्य म्हणून शाम लढ्ढा, सुहास दोशी, निखील मेहता व संदीप शहा यांची नियुक्ती केली आहे. तसेच आमंत्रित सदस्य म्हणून अशोक अगरवाल, हरिराम चौधरी, मुकेश शहा, प्रकाश नहार, आशिष नहार, श्री. विजय नहार यांची नियुक्ती केली आहे.
चेंबरच्या वाणिज्य विश्व समिती, वांधा निवाडा समिती, समन्वय समिती – स्त्री कामगार कल्याण योजना व यंदा प्रथमच स्थापन केलेल्या क्रीडा व सांस्कृतिक कार्य समिती आदी समित्यांचेही गठण यावेळी करण्यात आले आहे, अशी माहिती दि पूना मर्चटस् चेंबरचे माजी अध्यक्ष राजेंद्र बाठिया यांनी दिली.

get_footer();