आवृत्ती पुणे
← Back to Homepage

2 मोबाईल, 3 सीमकार्ड जेलमध्ये पोहच कर’!

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • September 2, 2021

येरवडयातून ‘गँगस्टर’ सागर राजपूतची वसुलीसाठी राणी मारणेला सांकेतिक भाषेत चिठ्ठी

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

उसन्या पैशांवर मनमानी व्याज आकारत जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी येरवडा कारागृहातील आरोपीने त्याच्या बहिणीला सांकेतिक भाषेत चिठ्ठी लिहिली. ‘दोन सॅमसंग गुरूचे मोबाईल, एअरटेल, व्होडाफोन, आयडीयाचे प्रत्येकी एक सीम कारागृहात पोहच कर’, अशा सूचना तिला देण्यात आल्या असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. या प्रकरणी सागर कल्याण राजपूत (वय ३४, रा. शास्त्रीनगर, कोथरूड. मुळ रा. कल्प डिझायनर गोत्री, वडोदरा, गुजरात) आणि राणी सागर मारणे (वय २७, रा. कोथरूड) यांना अटक केली आहे.


सागर हा सध्या येरवडा कारागृहात असून, राणी हिला अटक करून कारागृहात रवानगी केली आहे. राणी हिला अटक होण्यापूर्वी सागरने तिला सांकेतिक भाषेत चिठ्ठी पाठवली होती. या चिठ्ठ्या पोलिसांनी तपासादरम्यान जप्त केल्या आहे. दरम्यान राणी हिने जामिनासाठी अर्ज केला होता. त्यास सरकारी वकील विशाल मुरळीकर यांनी विरोधात केला.

दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून घेत प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जान्हवी केळकर यांनी तिचा जामीन अर्ज फेटाळला आहे. दरम्यान, ॲड. मुरळीकर यांनी युक्तिवाद केला की, राणी हिने सागर याची पत्नी जिग्नेशा राजपुत यांनी मिळून फिर्यादी यांना धमकावून त्यांच्याकडून जुलै अखेरपर्यंत चार लाख ४५ हजार रुपये घेतले आहे. सागर याने सांकेतिक भाषेत चिठ्ठी लिहून त्यांच्या साथीदारांना पैसे कसे वसूल करायचे याबाबत सूचना दिलेल्या आहेत. राणी ही कोणाच्या मदतीने सागर यास कारागृहातचिठ्ठी पाठवत याचा तपास करायाच आहे. त्यामुळे तिचा जामीन फेटाळण्यात आला.

get_footer();