आवृत्ती पुणे
← Back to Homepage

दहशत माजविणाऱ्या विनायक गायकवाडवर स्थानबध्दतेची कारवाई

maharashtra jain warta • Maharashtra News Networks, MNN - Daily News(Post Slider), MNN - Social News, Other, Police, Social • December 21, 2023

पीसीबी गुन्हे शाखेची कारवाई

पुणे : सहकारनगर पोलीस ठाणे परिसरात दहशत माजविणाऱ्या विनायक गायकवाड या गुन्हेगारावर स्थानबध्दतेची कारवाई करण्यात आली.पीसीबी गुन्हे शाखेने ही कारवाई केली.

विनायक गायकवाड,(वय २२ वर्षे, रा. म्हसोबा मंदिराजवळ, तळजाईमाता वसाहत, पदमावती) याला ताब्यात घेण्यात आले आहे. नागपुर मध्यवर्ती कारागृह, नागपुर येथे १ वर्षाकरीता स्थानबध्दतेचे आदेश देण्यात आले आहेत.
पोलीस आयुक्तालयातील सहकारनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गुन्हे करणारा विनायक गायकवाड हा अभिलेखावरील सराईत गुन्हेगार आहे. त्याने साथीदारांसह सहकारनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत अग्निशस्त्र, कोयता, तलवार, या सारख्या जीवघेण्या घातक हत्यारांसह खुनाचा प्रयत्न, दंगा, बेकायदा अग्निशस्त्र हत्यार बाळगणे यासारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे केले आहेत. मागील ५ वर्षामध्ये त्याच्याविरूध्द ५ गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी कृत्यामुळे परिसरातील सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झालेली होती. तसेच त्याच्यापासून जीविताचे व मालमत्तेचे नुकसान होईल या भितीमुळे नागरिक उघडपणे तक्रार करण्यासस धजावत नव्हते.
ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहकारनगर पोलीस स्टेशन सुरेद्र माळाळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पी.सी.बी. गुन्हे शाखा चंद्रकांत बेदरे, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी पार पाडली.
स्थानबध्दतेची ही ७२ कारवाई आहे.

get_footer();