आवृत्ती पुणे
← Back to Homepage

सराईत गुन्हेगाराकडुन ७ पिस्टल व २४ काडतुसे जप्त

maharashtra jain warta • Maharashtra News Networks, MNN - Daily News(Post Slider), Police • December 21, 2023

पुणे : सराईत गुन्हेगाराकडुन ७ अवैध पिस्टल व २४ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. कोंढवा पोलीस ठाणे तपासपथकाने ही दमदार कामगिरी केली आहे.

संदेश, उर्फ संजय जाधव, (वय ३२ वर्षे, रा. गोकुळ हौसींग सोसायटी, आंगणवाडी चौक शेजारी मोरे वस्ती चिखली) शिवाजी उर्फ शिवा कुडेकर, (वय ३४ वर्षे रा. मु. पो. वाशेरे, ता. खेड जि. पुणे) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच ओमंकार बर्नाला हा पाहिजे आरोपी आहे तर त्याचा हस्तक राहुल लिंगवाले याला अटक करण्यात आली आहे. वरील तीनही अटक आरोपी यांच्याकडुन एकुण ३,५०,००० रुपये किंमतीची ७ अग्नीशस्त्र व १२,००० रुपये किंमतीची २४ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहे.
पोलीस आयुक्त यांनी पुणे शहरात बेकायदेशीरपणे अग्नीशस्त्र जवळ बाळगणाऱ्या आरोपींचा शोध घेऊन कारवाई करण्यासाठी आदेश दिले होते. त्याप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे, पोलीस निरीक्षक गुन्हे संदिप भोसले, संजय मोगले यांनी कोंढवा पोलीस ठाणे कडील तपास पथकाला सुचना दिल्या. तपास पथक अधिकारी दिनेश पाटील, व तपास पथकातील स्टाफ यांनी अश्या कोबिंग ऑपरेशन दरम्यान रेकार्डवरील आरोपी तपासून त्याची झडती घेतली. तसेच ते अग्नीशस्त्राबाबत देखील माहिती काढत होते. वरिलप्रमाणे शोध घेत असताना तपास पथकातील अंमलदार विशाल मेमाणे यांना माहिती मिळाली की बोपदेव घाटाच्या पायथ्याला गारवा हॉटेल जवळ एक व्यक्ती त्याच्या साथीदारासह काही दिवसापासुन येत असुन ते गुन्हेगार आहेत. त्यांच्या कमरेला पिस्टल लावुन फिरत असतात. ते सायंकाळच्या सुमारास पुन्हा बोपदेव घाटात गारवा हॉटेलच्या जवळ येणार आहे अशी माहिती मिळाली. त्याप्रमाणे तपास पथकातील स्टाफ यांच्या दोन टिम करुन गारवा हॉटेल येथे थांबले.
मिळालेल्या माहितीनुसार दोन व्यक्ती वडाफच्या गाडीतुन उतरुन गारवा हॉटेलच्या दिशेन जाऊ लागले. हे तेच असल्याचे लक्ष्यात येताच त्यांना स्टाफच्या मदतीने पकडुन ताब्यात घेण्यात आले. नाव पत्ता विचारत त्यांची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला प्रत्येकी एक पिस्टल व एकाच्या पॅन्टच्या खिशात ३ व एकाच्या खिशात २ जिंवत काडतुसे मिळुन आली आहे. त्यांच्याकडे अग्नीशस्त्राच्या परवान्याबाबत तसेच त्याच्याकडे अग्नीशस्त्र जवळ बाळगण्याचे कारण विचारले असता त्यांनी स्वरक्षणासाठी जवळ विनापरवाना जवळ बाळगले असल्याचे सांगितले. आरोपींवर चिखली, देहुरोड, वडगाव मावळ, निगडी, भोसरी पोलीस ठाणे येथे दरोडयाचा प्रयत्न, घरफोडी, वाहन चोरी, तसेच बेकायदेशीर अग्नीशस्त्र जवळ बाळल्याबाबत एकुण ३२ गुन्हे व खेड पोलीस ठाणे येथे खुन, जबरी चोरी व सरकारीकामात अडथळा केल्याबाबत एकुण ३ गुन्हे दाखल असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
आरोपीविरुद्ध बेकायदेशीर अग्नीशस्त्र जवळ बाळगल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडे आधिक तपास करता शिवाजी उर्फ शिवा कुडेकर यांच्या घरझडतीत लपवुन ठेवली आणखीन ३ अग्नीशस्त्र व ९ जिवंत काडतुसे मिळुन आली ती जप्त करण्यात आली आहे. त्यांनी अग्नीशस्त्र ही कोठुन आणली आहे याबाबत तपास केला असतांना त्यांनी मध्यप्रदेश मधील ओमंकार बर्नाला हयाच्याकडुन घेतल्याचे सांगितले. त्याअनुषंगाने मध्यप्रदेश येथे जाऊन ओमंकार बर्नाला पकडायचे असल्याने त्याला अटक आरोपी यांच्या मार्फतीने संपर्क करुन आणखीन दोन अग्नीशस्त्र व १० जिवंत काडतुसाची मागणी केली. तेव्हा त्याने ही अग्नीशस्त्र जि. जळगाव येथे घेऊन येतो असे सांगितले. तेव्हा त्याला पकडण्याकरता कोंढवा तपास पथकातील स्टाफने सापळा रचला. ओमंकार बर्नाला हा स्वतः त्याचा हस्तक राहुल लिंगवाले याच्यासह या ठिकाणी येऊन थोड्या अंतरावर थांबुन हस्तकाकडे दोन अग्नीशस्त्र व १० जिवंत काडतुसे पाठवुन दिले. हस्तकास ताब्यात घेऊन ओमंकार बर्नाला पकडण्याकरिता गेले असता तो मिळुन आला नाही. हस्तक राहुल लिंगवाले याच्याकडे मिळुन आलेली अग्नीशस्त्र व काडतुसे जप्त करण्यात आली आहे. तसेच गुन्हयात अटक करण्यात आली आहे. सहायक पोलीस निरीक्षक दिनेशकुमार पाटील हे अधिक तपास करित आहेत.
ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार, अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ ५ आर. राजा, सहायक पोलीस आयुक्त, वानवडी विभाग शाहूराजे साळवे, यांच्या मार्गदर्शनाखाली कोंढवा पोलीस स्टेशन येथील तपास पथकाचे सहा पोलीस निरीक्षक सहायक पोलीस निरीक्षक लेखाजी शिंदे, सतिश चव्हाण, निलेश देसाई, लवेश शिंदे, शाहीद शेख, लक्ष्मण होळकर, संतोष बनसुडे, सुजित मदन, ज्ञानेश्वर भोसले, सुरज शुक्ला यांच्या पथकाने केली आहे.

get_footer();