आवृत्ती पुणे
← Back to Homepage

आनंद पार्श्व गुरुकुल, केडगाव चे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta, MJW - Social News, MJW Daily News(Post Slider), News Slider, Social • December 28, 2023

केडगांव : श्री आनंद पार्श्व गुरुकुल, सोनेवाडी रोड, केडगाव चा २रा वार्षिक स्नेहसंमेलन महाराष्ट्र प्रवर्तक पूज्य श्री कुंदनऋषिजी म. सा., श्री आलोकऋषिजी म.सा., श्री दिव्यदर्शनाजी म. सा., श्री विनीतदर्शना जी म.सा., श्री प्रणवदर्शनाजी म.सा. व श्री ईशदर्शनाजी म.सा. यांच्या पावन उपस्थितित, पालक आणि इतर आमंत्रित महानुभावांच्या सान्निध्यात उत्साहात साजरा करण्यात आला.

विविधतेत एकता या संकल्पनेवर आधारित स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.
बडी साजन मंगल कार्यालयाच्या वातानुकूलित सभागृहात विद्यार्थ्यांनी आपल्या कला गुणांनी, नाट्य व नृत्य च्या आविष्कारांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.
या कार्यक्रमासाठी प. पू. आलोकॠषिजी म. सा. यांचे मार्गदर्शन लाभले. ‘आनंद नवकार परिवार ट्रस्ट चे कार्याध्यक्ष प्रा.डाॅ अशोककुमार पगारिया, सचिव राजेंद्र लुनिया, कोषाध्यक्ष सीए मोहन बरमेचा, विश्वस्त सुनिल बाफना हे समारंभास उपस्थित होते. अशोक भंडारी, इच्छाबाई बोरा यांनी ही प्रमुख उपस्थिती दर्शविली. त्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन स्नेहसम्मेलनाचे उद्घाटन झाले तसेच गुरुकुल कमेटीच्या मेघा बोरा, मधुबाला चोरडिया, राजेंद्र चोपडा, प्रितेश दुग्गड, चेतन भंडारी, सचिन बोरा, प्राचार्या मोना सुर्यवंशी, ज्योती पूरी मॅडम यांचे ही संयोजनात विशेष मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले. तसेच सर्व शिक्षक वृंद, पालक वर्ग यांचेही या कार्यक्रमाला विशेष सहकार्य लाभले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुष्मा क्षेत्रे व निकीता त्रिभुवन मॅडम यांनी केले व आभार प्रदर्शन शरद टिमकरे सर यांनी केले.

get_footer();