आवृत्ती पुणे
← Back to Homepage

मुलीचा बचाव करणाऱ्या ४ धाडसी तरूणांच्या कर्तृत्वाचा मराठा महासंघाकडून गौरव

maharashtra jain warta • News Slider, Previous Issue • June 29, 2023

महाराष्ट्र न्युज नेटवर्क

पुणे : येथील सदाशिव पेठेत तरूण मुलीला हल्लेखोरापासून वाचवणाऱ्या लेशपाल जवळगे च्या धाडसाचे कौतुक मराठा महासंघाच्या वतीने करण्यात आले.

बघ्यांच्या गर्दीत लेशपाल जवळगे, स्वप्निल ढवळे, निलेश जाजू, हर्षद पाटील या चार तरूणांचा मराठा महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
सदाशिव पेठेतून जाणाऱ्या पीडीत मुलीवर कोयत्याने वार करू पाहाणाऱ्या मुलाचा वार झेलत धक्का मारून त्या मुलीला या चौघांनी जीवाची पर्वा न करता वाचवले.
त्यांच्या या धाडसाबद्दल मराठा महासंघाचे राज्य उपाध्यक्ष बाळासाहेब अमराळे, कार्याध्यक्ष अमर पवार, सरचिटणीस गणेश मापारी, खजिनदार व्यंकटेश बोडके, महिला अध्यक्ष श्रुतिका पाडळे, उपाध्यक्ष मिलन पवार, उपाध्यक्ष संतोष आतकरे, युवक कार्याध्यक्ष राकेश गायकवाड, युवक संघटक अतिश शेडगे, दीपक देशमुख उपस्थित होते.

get_footer();