आवृत्ती पुणे
← Back to Homepage

25 लाखांच्या गिफ्टसाठी 46 लाखांवर पाणी सोडले

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • November 18, 2021

बिबवेवाडी पोलिसांत गुन्हा दाखल : सायबर चोरट्यांची हातचलाखी सुरूच

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : परदेशातून गिफ्ट पाठविले असून, ते कस्टममध्ये अडकले आहे. लॉटरी लागली, असे सांगून त्याची रक्कम मिळविण्यासाठी वेगवेगळ्या शुल्काच्या नावाखाली सायबर चोरट्यांचा मागील काही वर्षापासून धिंगाना सुरू आहे. अशा प्रकारचे वृत्त वारंवार प्रसारित होत असूनही या मायाजाळात अजूनही लोक अडकत आहे. २५ लाख रुपयांच्या लॉटरीची रक्कम मिळविण्यासाठी एकाने तब्बल ४६ लाख ३५ हजार २०० रुपये गमावले.

याप्रकरणी बिबवेवाडीमधील सुपर इंदिरानगर येथील ३४ वर्षांच्या तरुणाने फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनिल यादव, राहुल शर्मा, विनोद गुप्ता, विक्रम सिंग, पंकजकुमार, नितीन चौहान व इतरांवर बिबवेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार २२ मे ते २० ऑगस्ट २१ दरम्यान ऑनलाईन पद्धतीने झाला आहे.

फिर्यादीच्या व्हॉटसअ‍ॅपवर आरोपींनी संपर्क साधून फिर्यादी यांना तुम्हाला २५ लाख रुपयांची लॉटरी लागली आहे, असे सांगितले. ही लॉटरीची रक्कम मिळण्यासाठी वेगवेगळे शुल्क भरावे लागतील असे सांगत वेगवेगळ्या बहाण्याने विविध बँकेच्या खात्यावर पाठविण्यास सांगितले. लॉटरीची रक्कम मिळविण्याच्या मोहापायी फिर्यादी सायबर चोरट्यांच्या जाळ्यात अडकत गेले व त्यांनी ते सांगतील, त्याप्रमाणे रक्कम भरत गेले. त्यांनी २५ लाख रुपयांच्या लॉटरीसाठी तब्बल ४६ लाख ३५ हजार २०० रुपये भरले तरीही त्यांना लॉटरीची रक्कम मिळाली नाही. त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. प्राथमिक तपासानंतर आता हा गुन्हा बिबवेवाडी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला असून, अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक झावरे करीत आहेत.

get_footer();