आवृत्ती पुणे
← Back to Homepage

मार्शलच्या डोक्यात वीट घालून जखमी करणारा मद्यपि जेरबंद

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • September 28, 2021

चतुश्रुंगी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा : पांडवनगर पोलीस चौकीजवळील प्रकार

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : मद्यपिला गोंधळ घालू नका, असे समजावत असताना त्याने प्लास्टिकची खुर्ची उचलून गोंधळ घातला. त्यानंतर वीट डोक्यात घालून कर्तव्यावर असलेल्या मार्शलच्या डोक्यात घालून जखमी करणाऱ्याला पोलिसांनी अटक केले. ही घटना पांडवनगर पोलीस चौकीसमोर पांडवनगर येथे रविवारी (दि. २६) रात्री साडेनऊच्या सुमारास घडली.

केशव बरवराज कांबळे (वय २३, रा. पांडवनगर, पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी चतुश्रुंगी पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार महेंद्र करगळ यांनी फिर्याद दिली असून, त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.


पोलिसांनी सांगितले की, चतुश्रुंगी पोलीस स्टेशनचे मार्शल पांडवनगर पोलीस चौकी येथे कर्तव्यावर होते. त्यावेळी आरोपीला गोंधळ घालू नको, असे समजावत असताना प्लास्टिकची खुर्ची उचलून फिर्यादीच्या अंगावर धावून अपशब्द वापरला. त्यानंतर चौकीबाहेर पडलेली वीट डोक्यात मारून जखमी केले.

पुढील तपास चतुश्रुंगी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक रुपेश टेमगिरे करीत आहेत.

get_footer();