आवृत्ती पुणे
← Back to Homepage

पुण्यामध्ये २७ वर्षीय तरुणीचा विनयभंग

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • September 30, 2021

कोंढवा पोलिसांत दोघांवर गुन्हा : कोंढव्यातील कौसरबागमध्ये घडली घटना

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी महिला आत्याचाराचे गुन्हे दाखल होत आहेत. पुण्यातील कोंढवा परिसरात कामावरुन घरी जाणाऱ्या एका 27 वर्षाच्या तरुणीसोबत अश्लील चाळे करुन विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. हा प्रकार सोमवारी (दि.27) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास कौसर बाग येथे घडला आहे.

अक्षय बाळु जगताप (वय-26), आकाश लोंढे (वय-26 दोघे रा. भिमनगर वसाहत, मनिष पार्क शेजारी, कोंढवा खु.) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी कोंढवा परिसरात राहणाऱ्या 27 वर्षीय तरुणीने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, त्यानुसार दोन तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, पीडित तरुणी धुणीभांड्याची कामे करते.
सोमवारी सायंकाळी तरुणी काम संपवून घरी जात होती. त्यावेळी आरोपींनी तिला अडवून तिच्याकडील मोबाईल हिसकावून घेऊन तोडला. तसेच तिच्यासोबत अश्लिल चाळे करुन तिचा विनयभंग केला. पीडित तरुणीने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून आरोपींवर 354, 354ड, 427, 323 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

get_footer();