आवृत्ती पुणे
← Back to Homepage

पार्किंगमधून मोपेड काढून देण्याच्या बहाण्याने सोन्याची बांगडी चोरली

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • September 27, 2021

शनि मंदिराजवळ घडली घटना : विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये तिघा अज्ञातावर गुन्हा

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : पार्किंगमधून मोपेड काढून देण्याच्या बहाण्याने तिघांनी एक लाख पाच हजार रुपयांची सोन्याची बांगडी चोरून नेली. ही घटना शनि मंदिराच्या बाजूला निरामय मेडिकलसमोरील पार्किंगमध्ये घडली.

विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार तीन अज्ञातांवर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी शनि मंदिराच्या बाजूला असलेल्या निरामय मेडिकलसमोरील पार्किंगमधून मोपेड काढत होत्या. त्यावेळी तेथे असलेल्या तीन अनोळखी व्यक्तींनी गाडी काढून देण्याच्या बहाण्याने जवळ आले. तुम्ही गाडी धरून ठेवा असे म्हणत नकळत हातचलाखीने हातातील सोन्याची बांगडी (एक लाख पाच हजार रुपये) चोरून नेली. पुढील तपास विश्रामबाग पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक एस. ए. निकुंभ करीत आहेत.

get_footer();