आवृत्ती पुणे
← Back to Homepage

शासकीय कामात अडथळा आणणारे दोघे जेरबंद

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • September 27, 2021

दोघे फरार : मार्केटयार्डमधील शिवनेरी रोडवरील अतिक्रमण कारवाईदरम्यानचा प्रकार

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी दोघांना अटक केली असून, दोघे फरार झाले आहेत. ही घटना शुक्रवारी (दि. २४ सप्टेंबर) शिवनेरी रोड, मार्केट यार्ड येथे घडली.

आकाश दुधाळे (वय २४, रा. प्रेमनगर, मार्केट यार्ड, पुणे), साहिल शेलार (वय १८, रा. पद्मावती लुंकड शाळेजवळ, धनकवडी, पुणे) यांना अटक केली आहे. मेद्या राऊत (वय ३३, रा. घोरपडी पेठ, पुणे) यांनी मार्केट यार्ड पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयातील अतिक्रमण निरीक्षक स्टाफसह अतिक्रमणावर कारवाई करीत होते. त्यावेळी बिगारी प्रतिक शिंदे यास आरोपी म्हणाला मी तुला ओळखतो, तुला नंतर घरी येऊन बघतो, अशी धमकी दिली. गरिबांवर अन्याय करता, हप्ते घेता, कष्ट करून खाणाऱ्यांना त्रास देता म्हणून शिवीगाळ करीत फिर्यादीच्या अंगावर धावून तोंडावरील मास्क ओढून इतर साथीदारांना शासकीय कामात अडथळा आणला.
सहायक पोलीस निरीक्षक डाबेराव पुढील तपास करीत आहेत.

get_footer();