आवृत्ती पुणे
← Back to Homepage

सराईत वाहनचोर स्वामीला अटक

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • September 25, 2021

भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनची कारवाई : चार दुचाकी जप्त

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : शहरातील विविध भागातील दुचाकी हेरून चोरणाऱ्या सराईताला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केले. त्याच्याकडून चार दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.


गणेश दत्तात्रय स्वामी (वय २९ रा. भोरेश्वरनगर, पिराचामाळा, भोर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी राजेंद्र शांताराम साळुंखे (वय ४९) यांनी तक्रार दिली होती. त्यानुसार गुन्हा दाखल केला होता.


पोलिसांनी सांगितले की, कात्रज परिसरातील हद्दीतून राजेंद्र साळुंखे यांची दुचाकी चोरून नेल्याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांकडून तपास सुरू होता. त्यावेळी दुचाकीचोर कात्रज स्मशानभूमीजवळ थांबल्याची माहिती पोलीस अंमलदार अभिजीत जाधव व विक्रम सावंत यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून गणेश स्वामी याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने वाहनचोरीचे चार गुन्हे केल्याची कबुली दिली.


वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर, पोलीस निरीक्षक संगीता यादव, पोलीस निरीक्षक विजय पुराणिक, पोलीस उपनिरीक्षक अंकुश कर्चे, रविन्द्र भोसले, रविंद्र चिप्पा, गणेश सुतार, सचिन पवार, निलेश खोमणे, योगेश सुळ, हर्षल शिंदे, अभिजीत जाधव, गणेश शेंडे, राहूल तांबे, धनाजी धोत्रे, नवनाथ खताळ, सचिन गाडे, आशिष गायकवाड, विक्रम सावंत, जगदीश खेडकर, शिवदत्त गायकवाड यांच्या पथकाने ही कारवाई केली.

get_footer();