आवृत्ती पुणे
← Back to Homepage

जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • September 27, 2021

लष्कर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा : ईस्ट स्ट्रीटवरील युनियन बँकेसमोर घडला प्रकार

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : सत्या प्रमोटर डेव्हलपर्सच्या मालकाला कागदपत्र देण्यासाठी कर्मचारी थांबला होता, त्यावेळी व्यक्तीकडून दोन अनोळखींनी तुझ्या मालकाला तक्रार मागे घेण्यास सांग नाही, तर जिवंत सोडणार नाही, अशी धमकी देत कागदपत्रे हिसकावून पळून गेले. ही घटना इस्ट स्ट्रीटवरील युनियन बँकेसमोर घडली.

विजय गुप्ता (वय २९, रा. कोंढवा बुद्रुक) यांनी लष्कर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी मालकाला सत्या प्रमोटर डेव्हलपर्स नावाचे एक कोरे लेटरहेड, रबर स्टँम्प व कागदपत्रे देण्यासाठी थांबले होते. त्यावेळी दोन अज्ञात आरोपींनी मला पाठविले आहे. तुझ्या मालकाला त्यांचेविरुद्ध केलेली तक्रार मागे घेण्यास सांग, नाही त र, तुम्हाला जीवंत सोडणार नाही, असे म्हणून फिर्यादीच्या हातातील ५० रु.किमतीचे साहित्य ओढून घेऊन गाडीवरून निघून गेला.
पुढील तपास लष्कर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक डी. आर. डोंगळे करीत आहेत.

get_footer();