आवृत्ती पुणे
← Back to Homepage

3 वर्षात पैसे दुप्पट करण्याच्या आमिषाने 5 कोटींना गंडा

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • October 27, 2021

नोव्हेंबर २०१५ मध्ये पैसे ट्रान्स्फर केले होते : दोन कंपन्यांच्या संचालकाविरुद्ध गुन्हा दाखल

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : तीन वर्षांमध्ये पैसे दुप्पट करुन देण्याचे आमिष दाखवून कंपनीमध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडून ५ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. नोव्हेंबर २०१५ मध्ये पैसे ट्रान्स्फर केले होते.

याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी व्हेंचर इंडिया एल एल पी व फलक्रम फंड ३, चे चेन्नईचे संचालक अकील ऊर्फ इथन खत्री (रा. चेन्नई) आणि टेकमेड हेल्थ सेंटर कंपनीचे संचालक कृष्णा रामानाथन, डॉ. राजा (रा. चेन्नई) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अमन नंदलाल गुप्ता (वय ३८, रा. मगरपट्टा, हडपसर) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात (गु. र. नं. २४९/२१) फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी सांगितले की, आरोपींनी संगनमत करुन फिर्यादी यांना फसविण्याचे उद्देशाने ३ वर्षामध्ये पैसे दुप्पट करुन देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून ५ कोटी रुपये त्यांचे टेकमेड हेल्थ सेंटर आणि डायग्नॉस्टीक प्रा. लि. या कंपनीच्या बँक खात्यात नोव्हेंबर २०१५ मध्ये ट्रान्सफर करुन घेतले.

त्यानंतर अद्यापपर्यंत हे पैसे तसेच त्यावर अतिरिक्त मिळणारे पैसे फिर्यादी यांना न देता त्यांच्या पैशांचा अपहार करुन फसवणूक केली. सहायक पोलीस निरीक्षक ठाकूर अधिक तपास करीत आहेत.

get_footer();