आवृत्ती पुणे
← Back to Homepage

36 वर्षीय पत्नीवर अनैसर्गिक अत्याचार करणारा पती अटकेत

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • September 2, 2021

खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रकार : पत्नीला जीवे मारण्याची दिली होती धमकी

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

जीव देण्याची धमकी देऊन 36 वर्षीय पत्नीवर अनैसर्गिक अत्याचार करणाऱ्या पतीला पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी यांचा विवाह काही वर्षापूर्वी झाला होता. लग्नानंतर आरोपीने पत्नीला जीव देण्याची धमकी देऊन पत्नीची इच्छा नसताना अनैसर्गिक अत्याचार केले. तसेच, पत्नीचा मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचे पीडित महिलेने तक्रारीत म्हटले आहे. पीडित महिलेने पती विरोधात तक्रार दिल्यानंतर खडक पोलिसांनी पतीविरोधात गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

पुढील तपास खडक पोलीस करीत आहेत.

get_footer();