आवृत्ती पुणे
← Back to Homepage

रामटेकडीमध्ये दोन लाख ३० हजारांची चोरी

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • September 25, 2021
Sept 2016 Issu4
Spread the love

वानवडी पोलिसांत गुन्हा : कुलूपबंद घरफोडून चोरट्याने साधला डाव

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : घर बंद घराचे कुलूप तोडून ३० हजार रोख व सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण दोन लाख ३० हजार रुपयांच्या ऐवजावर चोरट्यांनी डल्ला मारला. ही घटना स.नं.१०९, रामनगर, रामटेकडी, हडपसर येथे २३ सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच ते सव्वासहाच्या दरम्यान घडली.


अनिसा ईस्लाम शेख (वय ३८, रा. स.नं.१०९, रामनगर, रामटेकडी, हडपसर) यांनी वानवडी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल केला आहे.


दरम्यान, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र गलांडे, वानवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक लगड, पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर, सहायक पोलीस उपनिरीक्षक जयवंत जाधव यांनी घटनास्थळावर भेट देऊन पाहणी केली.


पोलिसांनी सांगितले की, फिर्यादीचा पाणीपुरी विक्रीचा व्यवसाय आहे. पाणीपुरी व्यवसाय करण्यासाठी घराला कुलूप लावून गेले. मात्र, फिर्यादीचे पती लघुशंकेसाठी घरी परत आले. तेव्हा त्यांना दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसून आले, त्यांनी पत्नीला त्याबाबत कळविल्यानंतर त्यांनी घरी येऊन पाहणी केली. त्यावेळी लोखंडी कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरीला गेल्याचे निदर्शनास आल्याचे सांगितले. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक जयवंत जाधव करीत आहेत.

25 09 2021 4
get_footer();