आवृत्ती पुणे
← Back to Homepage

51 हजार वृक्षलागवडीचे भाजपच्या वतीने अभियान

maharashtrajainwarta • Previous Issue • July 26, 2021

देवेंद्र फडणवीस यांच्या ५१व्या वाढदिवसानिमित्त उपक्रम : जगदीश मुळीक यांच्या हस्ते शुभारंभ

पुणे : संकेत डुंगरवाल
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या ५१व्या वाढदिवसानिमित्त शहर भाजपच्या वतीने आयोजित केलेल्या ५१ हजार वृक्षलागवड अभियानाचा शुभारंभ भाजप शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या हस्ते पाचगाव-पर्वती वनविहारात करण्यात आला.

पाचगाव पर्वती (तळजाई टेकडी) येथे 510 देशी वृक्षांचे रोपण करण्यात आले. याप्रसंगी भाजप शहर अध्यक्ष जगदीश मुळीक म्हणाले, ‘‘शहराच्या विकासाचा पुढील 50 वर्षांचा वेध घेत देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे शहरात मोठ्या प्रमाणात पायाभूत विकासकामांना गती देण्यात आली. शाश्वत आणि गतिमान विकास करीत पुण्याला जगातील सर्वोत्कृष्ट शहर बनविण्याची फडणवीस यांची महत्त्वाकांक्षा आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्याचा उद्देशाने शहरात 51 हजार वृक्ष लावण्याचे अभियान हाती घेण्यात आले. त्या अंतर्गत आज पाचगाव पर्वती (तळजाई टेकडी) येथे 510 देशी वृक्षांचे रोपण झाले. पुढील आठ दिवस हे अभियान सुरू राहील.’’
वृक्षलागवडीच्या अभियानात भाजप शहर अध्यक्ष जगदीश मुळीक, आमदार सुनील कांबळे, उपमहापौर सरस्वतीताई शेंडगे, सरचिटणीस राजेश पांडे, सुशील मेंगडे, दीपक पोटे, राजेश येनपुरे, संदीप लोणकर, जितेंद्र पोळेकर, उपाध्यक्ष डॉ. श्रीपाद ढेकणे, वृक्ष प्राधिकरण समितीचे सदस्य संदीप काळे, प्रशांत हरसुले, विशाल पवार, धर्मेश रजपूत, मनोज भालेराव, लालजी मिश्रा, विकास लवटे, हेमंत लेले, अंकित शेळके, अक्षय वायाळ, आशिष गोयल, ओमकार केदारी, महेंद्र व्यास, पुष्कर तुळजापूरकर, प्रशांत दिवेकर, लहू जागडे, जीवन माने, प्रशांत थोपटे, तेजस गाडे, हेमाताई शिंदे, अनिल जाधव, रफिकभाई शेंख आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाची आयोजन शहर भाजप सरचिटणीस गणेश घोष खंडाळकर यांनी केले, तर सूत्रसंचालन निहल घोडके यांनी केले.

केंद्र सरकारने नागरी वन उद्याने विकसित करण्यावर भर दिला आहे. त्यानुसार पुणे महापालिकेने संयुक्त वन व्यवस्थापन योजनेअंतर्गत 26 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असून, त्या माध्यमातून पुढील पाच वर्षांत शहरातील टेकड्यांवर मोठ्या प्रमाणात वनीकरण करता येईल.
जगदीश मुळीक, भाजप शहर अध्यक्ष

get_footer();