आवृत्ती पुणे
← Back to Homepage

51 वा “मोक्का” मार्केटयार्ड पोलीस स्टेशन ह्ददीत

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • December 18, 2021

पुणे पोलीस आयुक्त जोमात : गुन्हेगार जात आहेत कोमात

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : मार्केटयार्ड पोलीस ठाणे हद्दीमध्ये राहणारा गुन्हेगार नामे-शहारूख उर्फ मुन्ना सलीम शेख वय १९ रा- गल्ली नं.०७ स.नं. ५७० आंबेडकरनगर मार्केटयार्ड पुणे हा रेकोर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर पोलीस आयुक्तांच्या आदेशाने एमपीडीए कायदयान्वये कारवाई करण्यात आली आहे. या कायद्यानुसार कारवाई झालेला हा 51 वा आरोपी आहे.

त्याने त्याचे साथीदारांसह मार्केटयार्ड पोलीस ठाणे, पुणे हद्दीमध्ये तलवार, लोखंडी रॉड, या सारख्या जीवघेण्या हत्यारांसह फिरुन खुनाचा प्रयत्न, घातक शस्त्राने जबर दुखापत पोचवणे, चोरी, बेकायदा हत्यार बाळगणे यासारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे केले आहेत. मागील ०५ वर्षामध्ये त्याच्या विरूध्द ०३ गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे सदर परिसरातील सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झालेली होती. तसेच त्याच्यापासून जीविताचे व मालमत्तेचे नुकसान होईल या भितीमुळे नागरिक उघडपणे तक्रार करणेस धजावत नव्हते.

प्राप्त प्रस्ताव व सह कागदपत्रांची पडताळणी करुन अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त, पुणे शहर यांनी नमूद इसमाचे विरुध्द एमपीडीए कायदयान्वये औरंगाबाद मध्यवर्ती कारागृह, औरंगाबाद येथे ०१ वर्षाकरीता स्थानबध्दतेचे आदेश पारीत केले आहेत. नमूद इसमास स्थानबध्द करण्यामध्ये अनघा देशपांडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मार्केटयार्ड पोलीस ठाणे पुणे शहर व वैशाली चांदगुडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पी.सी.बी. गुन्हे शाखा पुणे शहर यांनी कामगिरी पार पाडली.

get_footer();