आवृत्ती पुणे
← Back to Homepage

सावकारीतून डोक्यात वार करुन खुनाचा प्रयत्न

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • September 28, 2021
Octo 2016 Issu41
Spread the love

वानवडी परिसरातील घटना : 4 कोटी 60 लाख रुपयांची मागणी

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : उसने पैशांचे प्रकरण सर्व पैसे देऊन मिटले असताना आणखी 4 कोटी 60 लाख रुपयांची मागणी करुन तिघांनी हत्याराने डोक्यात वार करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस आला.

याप्रकरणी विजेंयद्र पवार (वय 32, रा. सोपानबाग, घोरपडी) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी संपत इसवे, इलीयस शेख, रामा अशा तिघांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, विजयेंद्र पवार यांनी संपत इसवे याच्याकडून उसने पैसे घेतले होते. ते प्रकरण मिटले असतानाही संपत इसवे, उलीसय शेख, व रामा असे तिघे जण रविवारी सकाळी सव्वा नऊ वाजता पवार यांच्या घरात जबरदस्तीने घुसले. संपत याने पुन्हा 4 कोटी 60 लाख रुपयांची मागणी केली. फिर्यादी यांनी माझ्याकडे पैसे नाहीत असे सांगितले. तेव्हा शेख याने दरवाजा लावून घेतला. संपत याने त्याच्या बॅगेमधील हत्यार काढून फिर्यादी यांच्या डोक्यावर वार करीत असताना तो त्यांच्या पायावर लागून फिर्यादी जखमी झाले.

तसेच त्यांच्या भावाने मध्ये पडून अडविण्याचा प्रयत्न केला असता त्याला देखील धक्काबुक्की करुन वार करण्याचा प्रयत्न करुन किरकोळ जखमी केले. वानवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक लगड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जयवंत जाधव पुढील तपास करीत आहेत.

28 09 2021 4
get_footer();