आवृत्ती पुणे
← Back to Homepage

कांद्याचे पोते चोरणार्‍यास अटक

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • January 17, 2022

मार्केटयार्ड पोलिसांची कामगिरी : कांद्याचे भाव सर्वसाधारण असतानाही केले कृत्य

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : कांद्याचे भाव गगनाला भिडले की, कांद्याची चोरी होण्याचे प्रकार घडतात. मात्र, आता कांद्याचे भाव सर्वसाधारण असतानाही एकाने चक्क ५५ किलोचे कांद्याचे पोते चोरुन नेले. मार्केटयार्ड पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

सद्दाम फारुखउद्दीन शेख (वय ३४, रा. कोंढवा) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

पोलिसांनी सांगितले की, मार्केटयार्डातील कांदा बटाटा विभागातील गाळा नं. ७५० समोर कांद्याची पोती विक्रीसाठी ठेवण्यात आल्या होत्या. त्यातील ११०० रुपये किंमतीची ५५ किलो वजनाचे कांद्याचे पोते शेख यांनी चोरुन नेले होते. हे लक्षात आल्यावर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पुढील तपास मार्केटयार्ड पोलीस स्टेशनचे पोलीस करीत आहेत.

get_footer();