आवृत्ती पुणे
← Back to Homepage

बीट मार्शलला विटेने मारहाण करणाऱ्या तरुणाला अटक

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • September 30, 2021
Nov 2016 Issu38
Spread the love

चतु:श्रृंगी पोलीसांनी केली कारवाई : पांडवनगर चौकीसमोर घडला होता प्रकार

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : दारुच्या नशेत रस्त्यामध्ये गोंधळ घालणाऱ्या तरुणाला समजावून सांगण्यासाठी गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला करणाऱ्यास अटक केली. हा प्रकार चतु:श्रृंगी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पांडवनगर पोलीस चौकीसमोर रविवारी (दि.26) रात्री साडेनऊच्या सुमारास घडला होता.

केशव बसवराज कांबळे (वय-25 रा. मरगम्मा देवी मंदिर शेजारी, पांडवनगर पोलीस चौकी समोर, पांडवनगर, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस नाईक महेंद्र तुकाराम करगळ (वय-38) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी सांगितले की, आरोपी केशव कांबळे हा पोलीस चौकीसमोर मद्यपान करून गोंधळ घालत होता. त्यावेळी फिर्यादी महेंद्र करगळ हे त्याला गोंधळ घालू नकोस असे समजावून सांगत होते. त्यावेळी त्याने त्यांना शिवीगाळ करत प्लास्टिकची खुर्ची उचलून अंगावर धावून गेला.
करगळ यांनी त्याला पकडून चौकीच्या बाहेर आणले असता त्याने बाजूला पडलेली विट उचलून त्यांच्या डोक्यात मारुन जखमी केले होते.
पुढील तपास पोलीस करीत आहेत.

30 09 2021 5
get_footer();