आवृत्ती पुणे
← Back to Homepage

एमआयटी कॅम्पसमध्ये ६०-७० फूट उंचीवरून पडल्याने मजुराचा मृत्यू

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • November 17, 2021

लोणी काळभोरमधील घटना : ठेकेदाराने मजुरांना पुरेशी साधने न पुरविल्याने घडली घटना

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : लोणी काळभोरमधील एमआयटी कॅम्प्समध्ये ठेकेदाराने पुरेसी साधने न पुरविल्यामुळे ६० ते ७० फूट उंचीवरून पडून मजुराचा मृत्यू झाला. एमआयटी कॉलेज परिसरामध्ये रविवारी (दि. १४ नोव्हेंबर २०२१) रोजी दुपारी तीनच्या सुमारास घडला.

जीवाराम मोहनलाल (वय २२, रा. एमआयटी कॅम्प्स, लोणी काळभोर, ता. हवेली, जि. पुणे, मूळगाव- आपरी खेडा, तहसील- पिंडवाडा जि. सिराही, राजस्थान) असे मृत्युमुखी पडलेल्या कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक भागवत शेंडगे यांनी फिर्याद दिली असून, त्यानुसार ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, लोणी काळभोरमधील (ता. हवेली) एमआयटी परिसरात मजूर काम करीत होता. कामगाराच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हेल्मेट, जाळी, सेफ्टी बेल्ट आदी साधनसामुग्री दिली नव्हती. तसेच, उघड्या डक्टवर ठेवण्यासाठी साधने नव्हती. हलगर्जी व निष्काळजीपणामुळे बिगार कामगाराचा ६० ते ७० फूट उंचीवरून पडला. त्यामुळे त्याच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस स्टेशन पोलीस उपनिरीक्षक हनुमंत तरटे करीत आहेत.

get_footer();