आवृत्ती पुणे
← Back to Homepage

66 वर्षाच्या बहिणीची 70 वर्षाच्या भावाविरोधात तक्रार

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • November 20, 2021

वानवडी पोलिसांत गुन्हा : बनावट मृत्यूपत्र तयार करून केली फसवणूक

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : कॅप्टन असलेल्या आपल्या वडिलांच्या अपघाती मृत्युनंतर मुलाने बनावट मृत्युपत्र तयार करुन आपली बहिण आणि आईची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी ६६ वर्षाच्या बहिणीच्या तक्रारीवरुन वानवडी पोलिसांनी ७० वर्षाच्या भावाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

वसुंधरा अर्जुन राजवाडे (वय ६६, रा. विंडसर एव्हेन्यू, वानवडी) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अजितसिंग हनुमंतराव जगताप (वय ७०, रा. ताडीवाला रोड) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी व आरोपी हे भाऊ बहिण आहेत. त्यांचे वडिल कॅप्टन अर्जुन राजवाडे यांच्या निधनानंतर त्यांच्या मिळकतीत फिर्यादी, आई व भाऊ असे सम प्रमाणात प्रत्येकी ३३.३३ टक्के हिश्याचे वारस आहेत. आरोपीने २००३ मध्ये दुय्यम निबंधक कार्यालयात फिर्यादी व त्यांचे आईचे वारस म्हणून असणारा हिस्सा परस्पर कमी करुन तो फक्त २६ टक्के हिस्सा ठेवला.

वडिलांचे बनावट मृत्युपत्र तयार करुन स्वत:चा आर्थिक फायदा करुन घेतला. तसेच वडिलांच्या मृत्युनंतर नुकसान भरपाई म्हणून कंपनीकडून फिर्यादीस मिळणारे २५ लाख २४ हजार ७८० रुपये आरोपीने फिर्यादीकडून विकसनाकरीता घेतले. तेथे इमारती बांधून भाड्यातून मिळणारी रक्कम स्वत: बळकावली आहे. फिर्यादीस त्यांची रक्कम परत न करता शिवीगाळ करुन धमकावले आहे. अशा तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

get_footer();