आवृत्ती पुणे
← Back to Homepage

7 वर्षाच्या पुतणीवर लैंगिक अत्याचार करणारा अटकेत

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • December 13, 2021

हडपसर पोलिसांत फिर्याद : मानव जातीला काळीमा फासणारी पुण्यातील धक्कादायक घटना

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : लाडीगुडी लावून दीर आपल्याच ७ वर्षाच्या पुतणीवर गेल्या ६ महिन्यांपासून लैंगिक अत्याचार करीत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार जून ते 6 डिसेबर 2021 दरम्यान वारंवार मांजरीतील एका सोसायटीत घडला आहे.

याप्रकरणी एका 28 वर्षाच्या महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी मांजरी येथील 22 वर्षाच्या दिराला अटक केली आहे.

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी यांच्या 7 वर्षाच्या मुलीला त्यांचा दीर असलेल्या आरोपीने लाडीगोडी लावली. तिच्या अज्ञानपणाचा गैरफायदा घेऊन तिच्यासोबत जबरदस्तीने लैंगिक संबंध केले. हा प्रकार कोणाला सांगितला तर तुझ्या बापाला जीवे ठार मारील अशी धमकी दिली. त्यामुळे हा प्रकार तिने कोणाला सांगितला नव्हता. मात्र, तिला त्रास होऊ लागल्याने तिने हे आईला सांगितले. त्यानंतर त्यांनी हडपसर पोलिसांकडे धाव घेतली असून पोलीस उपनिरीक्षक गोसावी अधिक तपास करीत आहेत.

get_footer();