आवृत्ती पुणे
← Back to Homepage

७२ हजार रुपयांचा सोन्याचा हार चोरणारा अटकेत

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • October 28, 2021

विश्रामबाग पोलिसांत गुन्हा : सेनादत्त पेठ येथील रस्त्यावर घडला प्रकार

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेल्या महिलेच्या गळ्यातील ७२ हजार रुपयांचा हार चोरणाऱ्यास अटक केले आहे. ही घटना सेनादत्त पेठ येथील सार्वजनिक रस्त्यावर बुधवारी (दि. २७ ऑक्टोबर २०२१) सकाळी पावणेआठच्या सुमारास घडली.

अक्षय इंगळे (वय १८, रा. दत्तवाडी, पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी सेनादत्त पेठ, पुणे येथील ५१ वर्षीय व्यक्तीने विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले फिर्यादीची आई मॉर्निंग वॉक करण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी आरोपीने त्यांच्या गळ्यातील ७२ हजार रुपयांचे मणि असलेला हार चोरून नेत असताना पकडला. विश्रामबाग पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक राकेश सरडे पुढील तपास करीत आहेत.

get_footer();