आवृत्ती पुणे
← Back to Homepage

गुन्हे प्रतिबंध व उघडकीस आणण्यास सीसीटीव्ही कक्षाचा होणार उपयोग

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • September 30, 2021

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता : समर्थ पोलीस स्टेशन हद्दीत सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा निरीक्षण कक्ष

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : शहरातील समर्थ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये बसविलेल्या नवीन सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे सुसज्ज निरीक्षण कक्षाचा गुन्ह्यांना प्रतिबंध करणे व गुन्हे उघडकीस आणण्यासाठी निश्चितच उपयोग होईल. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तसेच शहर अधिक सुंदर होण्यासाठी पोलीस व महापालिका प्रशासनाने एकत्रित येऊन काम करण्याची गरज आहे. असे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी स्पष्ट केले.

पालिका सभागृहनेते गणेश बिडकर यांच्या विकासनिधीतून समर्थ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये नागरिकांच्या सुरक्षेसाठी १५० अद्ययावत सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पालिका आयुक्त विक्रम कुमार, पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, आमदार सुनील कांबळे, सभागृहनेते गणेश बिडकर,सहायक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे, पोलीस निरीक्षक शिल्पा चव्हाण, पोलीस निरीक्षक उल्हास कदम आदी उपस्थित होते.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता म्हणाले की, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक प्रकल्प करताना निधीची अडचण येते. पालिकेने यासाठी निधी दिला तर नागरिकांच्या हिताचे अनेक प्रकल्प मार्गी लागतील. पुणे पोलिसांनी ई-व्हेईकलसाठी प्रस्ताव पालिकेला दिला असून, पुढील काही दिवसांमध्ये हा प्रकल्पदेखील कार्यान्वित होईल, असे विश्वास त्यांनी व्यक्त केले.

दरम्यान, पालिका आयुक्त विक्रम कुमार म्हणाले की, शहरातील कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत राहावी, यासाठी पालिकेच्या माध्यमातून आवश्यकत ती मदत पोलिसांना देण्याचा प्रयत्न असणार आहे, असे त्यांनी सांगितले.

आमदार सुनील कांबळे म्हणाले की, कॅन्टोन्मेंट मतदारसंघातील पोलीस स्टेशनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी आमदार निधीतून एक कोटी रुपये तसेच, पोलीस वसाहती सुधारण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठपुरावा कऱण्याची ग्वाही त्यांनी दिली.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे यांनी प्रास्ताविक केले.

get_footer();