आवृत्ती पुणे
← Back to Homepage

गोळ्या देऊन ‘गर्भपात’ करणाऱ्या डॉक्टरसह दोघांवर गुन्हा

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • September 30, 2021

लोणीकाळभोर पोलिसांत गुन्हा : वानवडी पोलीस स्टेशनकडे पुढील तपासासाठी गुन्हा वर्ग

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : लग्नाचे आमिष दाखवून एका २५ वर्षाच्या तरुणीला वेगवेगळ्या लॉजवर नेऊन बलात्कार केला. यातून ती गर्भवती राहिल्यानंतर तिला गोळ्या देऊन तिचा गर्भपात केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. याप्रकरणी पुण्यातील लोणी काळभोर पोलीस ठाण्यात पीडित तरुणीने फिर्याद दिली आहे. तिच्या तक्रारीनुसार पोलिसांनी डॉक्टरसह दोघांवर गुन्हा दाखल करुन हा गुन्हा वानवडी पोलिसांकडे वर्ग केला आहे.

आशिष शैलेश सकपाळ (वय 34, रा. संतनगर, लोहगाव) आणि डॉ. दत्ता खैरनार (रा. धानोरी) अशी गुन्हा दाखल केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी मांजरी बुद्रुक येथील 25 वर्षाच्या तरुणीने फिर्याद दिली आहे. हा प्रकार सप्टेंबर 2020 ते जून 2021 या कालावधीत घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला आणि आरोपी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. आरोपीने घरी सोडण्याच्या बहाण्याने तिच्या सोबत अश्लिल चाळे करत लग्नाचे आमिष दाखवले. तसेच लोणावळा, वडकी, भेकराईनगर येथील लॉजवर नेऊन जबरदस्तीने शरीर संबंध ठेवले. यातून तरुणी गरोदर राहिली. त्यानंतर आरोपीने डॉ. दत्ता खैरनार यांच्याकडे घेऊन गेला. डॉ. खैरनार यांनी तरुणीला गोळ्या देऊन तिचा गर्भपात केला.

आरोपीने शरिरसंबंध ठेवतानाचे व्हिडिओ आणि फोटो पीडितेच्या परवानगीशिवाय काढले. आरोपीने हे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत लग्न करण्यास नकार देऊन तरुणीची फसवणूक केली. यानंतर तरुणीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला. तक्रार अर्जावरुन पोलिसांनी गुन्हा दाखल करुन पुढील तपासासाठी वानवडी पोलीस ठाण्याकडे वर्ग केला.
पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) सावळाराम साळगावकर करीत आहेत.

get_footer();