आवृत्ती पुणे
← Back to Homepage

टी.जे. कॉलेज आता हायटेक कॉलेज झाले. – कृष्णकुमार गोयल

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta, MJW - Social News, MJW Daily News(Post Slider), News Slider, Other, Social • January 8, 2024

पुणे : शैक्षणिक क्षेत्रात होत असलेले बदल महाविद्यालयातील प्राध्यापक आणि विद्यार्थी यांनी देखील स्वीकारायला हवेत यासाठीच टी. जे. कॉलेज आता हायटेक होत आहे, असे प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष कृषकुमार गोयल यांनी व्यक्त केले.

कॉलेज मध्ये विद्यार्थ्यांना हायटेक शिक्षण मिळावे म्हणून इंटरैक्टिव बोर्ड बसवण्यात आले आहेत त्याचे उदघाटन गोयल यांच्या हस्ते झाले. तेव्हा ते बोलत होते.
गोयल म्हणाले, नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांना आधुनिक पद्धतीने शिक्षण देण्याच्या पद्धतीनुसार महाविद्यालयामध्ये आता मोठ्या प्रमाणात परिवर्तन होताना दिसत आहेत. पुण्यातील विविध महाविद्यालय नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण प्रभावीपणे महाविद्यालयांमध्ये राबविण्यासाठी आधुनिक यंत्रणांचा वापर करताना दिसत आहेत. याचाच विचार करून खडकी शिक्षण संस्थेचे टिकाराम जगन्नाथ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय यांनी सुद्धा महाविद्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणात परिवर्तन घडवून आणले आहे. सन 2023-24 या शैक्षणिक वर्षात महाविद्यालयाने इ-स्टुडिओ ची निर्मिती करून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे. यामध्ये आत्तापावेतो १७५ पेक्षा जास्त इ कंटेंट निर्मिती झाली आहे .त्याचबरोबर काही दिवसांमध्ये महाविद्यालयाचे स्वतंत्र रेडिओ स्टेशन ८६.९ एफएम सुरू होत आहे. यासह महाविद्यालय आता खडू आणि फळा यांचा वापर न करता आधुनिक इंटरऍक्टिव्ह बोर्ड चा वापर करून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी गोडी निर्माण करीत आहे. खडकी शिक्षण संस्था ही विद्यार्थ्यांच्या विकासासाठी नेहमीच दक्ष असते. विद्यार्थी केंद्रित शिक्षण हा खडकी शिक्षण संस्थेचा मूळ गाभा आहे.
यावेळी संस्था सचिव यांनी खडकी शिक्षण संस्थेच्या टी जे महाविद्यालयाचे विद्यार्थी भाग्यवान असल्याचे सांगितले.
प्राचार्य डॉ संजय चाकणे यांनी टी जे महाविद्यालय हायटेक झाल्याबद्दल सर्व घटकांचे आभार व्यक्त केले आणि खडकीतील विद्यार्थी डिजिटली स्मार्ट असून इंटरैक्टिव बोर्ड चा उत्तम वापर करुन अध्यापनासाठी योग्य वापर करतील.
यावेळी संस्थेचे संचालक ज्ञानेश्वर मुरकुटे, रमेश अवस्थे, प्राचार्य संजय चाकणे , उपप्राचार्य अर्जुन मुसमाडे, उपप्राचार्य राजेंद्र लेले, प्रा. स्वामीराज भिसे आणि शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

get_footer();