आवृत्ती पुणे
← Back to Homepage

फ्रेंडशीपची मागणी करणार्‍या मजनूला ठोकल्या बेड्या

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • January 17, 2022

खडक पोलिसांची कारवाई : कस्तुरी चौकात भावांनी धू धू धुतला

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : मैत्री करण्यासाठी 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा भर रस्त्यात हात पकडून फ्रेंडशीपची मागणी करणार्‍या तरुणाला तिच्या भावांनी धु धु धुतला. याप्रकरणी खडक पोलिसांनी तरुणाला अटक केली आहे.

शुभम कैलास दारवटकर (वय 22, रा. शुक्रवार पेठ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी एका 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलीने खडक पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार शुभम याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, शुभम दारवटकर हा गेल्या दोन आठवड्यापासून एका मुलीच्या मागे लागला होता. ती शाळेत येत-जात असताना तिच्याशी मैत्री करण्याकरीता मागे मागे येऊन तिच्याकडे एकटक लावून पहात असे. ही मुलगी शनिवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास कस्तुरी चौकातून जात असताना शुभम तिच्या मागे मागे आला. मै तुम से फ्रेंडशीप करना चाहता हू, तूम मुझसे फ्रेंडशीप करो, असे म्हणून भर रस्त्यात तिचा हात पकडला. या घटनेची माहिती या मुलीच्या भावांना समजली. ते शुभम याचा शोध घेत असताना दुपारी दीड वाजता गुरुवार पेठेतील झुंजार मित्र मंडळासमोर तिघांनी त्याला गाठले. हाताने लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण करून जखमी केले.

get_footer();