आवृत्ती पुणे
← Back to Homepage

आरोपी अभियानामध्ये ८१७ गुन्हेगारांचा घेतला शोध

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • November 17, 2021

ऑल आऊट व कोंबिग ऑपरेशनद्वारे तीन हजार ३०३ सराईतांची केली तपासणी

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : हॉटेल, लॉजेस, ढाबे, एस.टी. व बसस्थानके, रेल्वे स्टेशन तसेच सार्वजनिक ठिकाणी आढळून आलेल्या तीन हजार ३०३ गुन्हेगारांची तपासणी केली. त्यामध्ये ८१७ गुन्हेगार आढळून आले. शहर कार्यक्षेत्रामध्ये ऑल आऊट व कोंबिग ऑपरेशन करून सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक गुन्हे शाखेंतर्गत संयुक्त कारवाई करण्यात आली.

आरोपी चेकिंग अभियानामध्ये तीन हजार ३०३ गुन्हेगारांना चेक केले, त्यामध्ये ८१७ गुन्हेगार मिळून आले.

आर्म ॲक्टनुसार गुन्हे शाखेने १८ केसेस व पोलीस स्टेशनने १२ केसेस करून ३२ आरोपींना अटक करीत त्यांच्याकडून २२ कोयते, ७ तलवारी, २ पालघन, एक दुचाकी मोपेड असा एकूण तीस हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. गुन्हे शाखेच्या युनिट-२, अंमली पदार्थ विरोधी पथक-२, दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-२, परिमंडळ-२, ३, ४, ५ ने प्रतिबंधात्मक कारवाई केली. परिमंडळ-१ ते५ अंतर्गत पोलीस स्टेशन यांनी ५ केसेस करून पाच आरोपींना अटक करून १२७ लिटर गावठी दारू, एक दुचाकी असा एकूण २४ हजार ६८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील ९० हॉटेल, लॉजेसची तपासणी करण्यात आली. नाकाबंदी दरम्यान ७२३ संशयित वाहनचालकांची तपासणी करून ५२ जणांवर कारवाई करण्यात आली. वाहतूक शाखेने ५४ रिक्षा, ७९ चार चाकी व इतर ७७ वाहने अशा एकूण २१० वाहनांवर कारवाई केली.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या आदेशान्वये पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे, अपर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, पोलीस उपायुक्त प्रियंका नारनवरे, पोलीस उपायुक्त सागर पाटील, पोलीस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड, पोलीस उपायुक्त रोहिदास पवार, पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा व पोलीस ठाण्यातील अधिकारी, अंमलदार तसेच वाहतूक विभागातील अधिकारी, अंमलदार यांच्या पथकाने संयुक्त कामगिरी केली.

get_footer();