आवृत्ती पुणे
← Back to Homepage

अनधिकृत पुतळा बसविणाऱ्याकडून पोलीसांना धक्काबुक्की

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • September 27, 2021

येरड्यातील सेवालाल चौकातील प्रकार : सार्वजनिक जागेवर परवानगीशिवाय बसविला पुतळा

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : येरवड्यातील सेवालाल चौकात महापुरूषांचा अनधिकृतरित्या पुतळा बांधकामकरून उभा केल्यानंतर तो काढून टाकण्यास सांगण्यास गेलेल्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसह पोलीसांना धक्काबुक्की करत सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याची घटना घडली आहे.

याप्रकरणी सनी चव्हाण (26 ), राहुल चव्हाण (29 ), आकाश चव्हाण (45 ), बबलु ऑझ (38) व लक्ष्मी चव्हाण (45, सर्व रा. येरवडा) यांना अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस कर्मचारी अजित मगदुम यांनी येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलीसांनी सांगितले की, आरोपींनी परवानगी न घेता चौकात बांधकामकरून महापुरूषांचा पुतळा उभा केला होता. तो पुतळा काढून घेण्यास त्यांना सांगण्यात आले होते. परंतु, त्यांनी पुतळा काढण्यास नकार देत सार्वजनिक ठिकाणी दंगाकरून गोंधळ घातला. तसेच, पालिका कर्मचारी, पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कायदेशीर कामात अडथळानिर्माण करत त्यांना धक्काबुक्की केली आहे.

get_footer();