आवृत्ती पुणे
← Back to Homepage

कोयत्याने मारहाण करणाऱ्या सातजणांवर गुन्हा

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • February 18, 2022

सिंहगड रोड पोलिसांत फिर्याद : नऱ्हेतील गोकुळनगरमध्ये घडला प्रकार

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : काय बघतोस रे म्हणत लोखंडी कोयत्याने मारहाण करणाऱ्या सातजणांवर गुन्हा दाखल केला आहे. नऱ्हेतील गोकुळनगरमध्ये १३ फेब्रुवारी २०२२ रोजीरात्री पावणेनऊच्या सुमारास ही घटना घडली.


अभिजित गायकवाड (वय २०, रा. नऱ्हे, पुणे) यांनी सिंहगड रोड पोलिसांत फिर्याद दिली असून, त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी व आरोपी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. नऱ्हेतील गोकुळनगरमध्ये फिरण्यासाठी गेले असता काय बघतोस रे असे म्हणून लोखंडी कोयत्याने जीवे मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, फिर्यादी जीवाच्या भीतीने पळून गेल्याने आरोपीने फिर्यादीच्या गाडीचे नुकसान करीत रस्त्याच्या कडेला उभ्या केलेली वाहने खाली पाडून नुकसान करीत ये-जा करणाऱ्यांना शिवीगाळ करीत धमकी देत दहशत निर्माण केली. सिंहगड रोड पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत कणसे पुढील तपास करीत आहेत.

get_footer();