आवृत्ती पुणे
← Back to Homepage

सात महिन्यांपासून महिलेशी अश्लिल चाळे करणारा मॅनेजर जेरबंद

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • September 25, 2021

लोणीकाळभोर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार : मंतरवाडीतील गोडाऊनमध्ये घडला प्रकार

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : गोडावूनमध्ये काम करणार्‍या महिला कामगाराशी कामाचे निमित्त करुन जवळीक साधून गेली ७ महिने तो अश्लिल आणि नको ते चाळे करायचा. त्याच्या या वर्तनामुळे त्रासलेल्या महिलेने शेवटी पोलिसांकडे धाव घेतली. लोणी काळभोर पोलिसांनी या मॅनेजरला अटक केली आहे.

मंगेश बादोले (वय ३४, रा. मंतरवाडी, उरुळी देवाची) असे या मॅनेजरचे नाव आहे. हा प्रकार मंतरवाडी येथील एका गोडावूनमध्ये फेब्रुवारी ते ११ सप्टेंबर २०२१ दरम्यान घडला. याप्रकरणी एका ३२ वर्षाच्या महिलेने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी आणि आरोपी हे एकाच कंपनीत कामाला असून, फिर्यादी या कामगार तर, आरोपी हा मॅनेजर आहे. त्याने मॅनेजर असल्याचा गैरफायदा घेत कामाचे निमित्त करुन फिर्यादी यांच्याशी जवळीक साधण्याचा प्रयतन केला.

वारंवार हात धरणे, मांडीला हात लावणे, अंगावर हात फिरवणे, पाठीवर हात फिरवणे असे कृत्य करुन फिर्यादीच्या शरीराशी चाळे करुन फिर्यादी यांच्या मनात लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन करीत होता. ११ सप्टेंबर रोजी त्याने पुन्हा असेच करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा फिर्यादी यांनी त्याला विरोध केल्याने त्याने शिवीगाळ करुन विनयभंग केला. या घटनेने महिलेने फिर्याद दिली असून पोलिसांनी मॅनेजरला अटक केली आहे.

get_footer();