आवृत्ती पुणे
← Back to Homepage

बेकायदा क्रिकेट बेटिंग अडड्यांवर गुन्हे शाखेची धडक कारवाई

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • September 28, 2021

अशोक जैन व गणेश भुतडा दोघे ताब्यात : 92 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : बेकायदा क्रिकेट बेटिंग अडड्यांवर गुन्हे शाखेअंतर्गत केलेल्या धडक कारवाईमध्ये दोन ठिकाणांवरून दोघांना ताब्यात घेण्यात आणि अनुक्रमे 92 लाख 59 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश मिळाले आहे.


दि. १९ सप्टेंबर २०२१ पासून दुबई येथे सुरू असलेल्या आयपीएल क्रिकेट मॅचेस सुरू झाल्या असून, सदर आयपीएल क्रिकेट मॅचेसवर मोठ्या प्रमाणात बेकायदा ऑनलाईन बेटिंग सुरू असल्याबाबत पोलीस आयुक्त पुणे शहर अमिताभ गुप्ता यांना गोपनीय माहीती प्राप्त झाल्याने त्यांनी सदर ऑनलाईन सुरू असलेल्या बेकायदा बेटिंगच्या ठिकाणी कायदेशीर कारवाई करणेबाबत आदेशित केले. त्यावरुन २६ सप्टेंबर रोजी पोलीस उपआयुक्त प्रियंका नारनवरे, पोलीस उपआयुक्त (आर्थिक गुन्हे शाखा) भाग्यश्री नवटके यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखा व गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांची वेगवेगळी पथके तयार करण्यात आली.


क्रिकेट मॅचवर बेकायदा चालणाऱ्या बेटिंगच्या ठिकाणाची गोपनीय माहीती प्राप्त केली असता, समर्थ पोलीस ठाणे हद्दीत इंद्रप्रस्थ कॉम्प्लेक्स समोरील त्रिमूर्ती सोसायटी येथे गणेश भिवराज भुतडा (वय ५०, रा. रास्ता पेठ, पुणे) हा क्रिकेट मॅचवर बेकायदा ऑनलाईन बेटिंग घेत असताना मिळून आला. त्याच्या जवळ ९२,६५,००० रुपये किमतीचा माल, त्यामध्ये ९२,००,००० रुपये रोख रक्कम आणि ६५,००० रुपये किमतीचे मोबाईल व नोटा मोजण्याची मशिन इत्यादी मुद्देमाल मिळून आला. त्यास मुद्देमालासह ताब्यात घेऊन त्याचेविरुधद्ध जुगार प्रतिबंधक अधिनियमासह भारतीय टेलिग्राफ अॅक्टअन्वये समर्थ पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

तसेच मार्केट यार्ड पोलीस ठाणे हद्दीत अशोक भवरलाल जैन (वय ४८ रा. बी ५०३, हाईड पार्क मार्केट यार्ड पुणे ) हा क्रिकेट मॅचवर ऑनलाईन जुगार घेत असताना मिळून आला. त्याच्या जवळ ५९,००० रुपये किमतीचा माल, त्यामध्ये ५१,७०० रुपये रोख रक्कम आणि ७००० रुपये किमतीचे सात मोबाईल, लेटर पॅड व मोबाईल स्टॅन्ड इत्यादी मुद्देमाल मिळून आल्याने त्यास मुद्देमालासह ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध जुगार प्रतिबंधक अधिनियमअन्वये मार्केटयार्ड पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर दोन्ही गुन्ह्यांतील नमुद आरोपी यांना अटक करण्यात आली आहे.
सदरची कामगीरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, पोलीस उपआयुक्त प्रियंका नारनवरे, पोलीस उपआयुक्त (आर्थिक गुन्हे शाखा) भाग्यश्री नवटके यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखा व गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या पथकाने केली आहे.

get_footer();