आवृत्ती पुणे
← Back to Homepage

दि पूना मर्चंट्‌स चेंबरचा आणखी एक विक्रम

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta, MJW Daily News(Post Slider), News Slider, Other • December 29, 2023

दिवाळीतील ‘लाडू-चिवडा’ उपक्रमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर नोंद

पुणे : विविध सामाजिक उपक्रमांद्वारे अनुकरणीय आदर्श निर्माण करणाऱ्या दि पूना मर्चंट्‌स चेंबरने आणखी एक विक्रम केला आहे. यंदाच्या दीपावली उत्सवामध्ये गरजूंसाठी राबवलेल्या लाडू-चिवडा वितरण उपक्रमाची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली आहे. सर्वाधिक लाडू-चिवडा बनवण्याचा विक्रम चेंबरच्या नावे नोंदला गेला आहे.

सामाजिक गरज लक्षात घेऊन चेंबरने या उपक्रमाची सुरुवात केली, यंदाच्या दिवाळीत या उपक्रमाचे ३८ वे वर्ष होते. एवढ्या मोठ्या प्रमाणावर राबवला जाणारा, प्रदीर्घ काळ सातत्य असलेला, अशा स्वरूपाचा हा एकमेव सामाजिक उपक्रम आहे. त्यामुळे त्याची लोकप्रियता वाढतच गेली आणि आमचेही ते ‘सामाजिक मिशन’ बनले, असे उद्‌गार चेंबरचे मावळते अध्यक्ष राजेंद्र बाठिया यांनी काढले.
यापूर्वी २००४ मध्ये लिम्का बूक ऑफ रेकॉर्ड्‌स, २०१२ मध्ये गिनीज बूक ऑफ रेकॉर्ड्‌स या जागतिक संस्थांनी चेंबरच्या या उपक्रमाची दखल घेतली होती. यंदा चेंबरच्या अमृतमहोत्सवी वर्षात इंटरनॅशनल बूक ऑफ रेकॉर्ड्‌स आणि इंडियाज वर्ल्ड रेकॉर्ड्‌स या आणखी दोन नामवंत संस्थांनी ‘लाडू-चिवडा’ उपक्रमाची नोंद घेऊन प्रमाणपत्र दिले, ही आमच्यासाठी अत्यंत गौरवास्पद बाब आहे, असेही बाठिया म्हणाले.
यंदा दिवाळीत झालेल्या उपक्रमामध्ये तब्बल दोन लाख किलो लाडू-चिवडा तयार करून त्याचे गरजूंना वितरण करण्यात आले. एका वेळी सर्वाधिक लाडू-चिवडा तयार करण्याची ही पहिलीच घटना असल्याने, इंटरनॅशनल बूक ऑफ रेकॉर्ड्‌स आणि इंडियाज वर्ल्ड रेकॉर्ड या दोन संस्थांनी प्रमाणपत्र देऊन चेंबरला सन्मानित करत, या सामाजिक कार्याची आगळीवेगळी दखल घेतली आहे.

get_footer();