आवृत्ती पुणे
← Back to Homepage

दहा वर्षे पोलिसांना गुंगारा देणारा सराईत दरोडेखोर अखेर जेरबंद

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • September 28, 2021

दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक एकची कामगिरी : तोफखाना पोलीस स्टेशनकडे ताबा

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : दहा वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या सराईत दरोडेखोरास जेरबंद करण्यात दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक एकला अखेर यश मिळाले असून, त्यास तोफखाना पोलीस स्टेशन (जि. अहमदनगर)च्या ताब्यात देण्यात आले आहे.


दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक क्रं १, गुन्हे शाखा, पुणे शहर कडील पोलीस अंमलदार हे कोथरूड, वारजे माळवाडी व सिंहगड रोड पोलीस स्टेशनचे हद्दीत दरोडा व वाहनचोरी विरोधी प्रतिबंध पेट्रोलिंग करीत असताना पोलीस शिपाई श्रीकांत दगडे यांना त्यांच्या गोपनीय बातमीदाराकडून बातमी प्राप्त झाली की, तोफखाना पोलीस स्टेशनमधील गुन्हा दाखल झाल्यापासून १० वर्षांपासून फरार झालेला पाहिजे आरोपी राजू बाबूराव जावळकर (वय ५५, रा. मूळगाव मु.पो. खानापूर, ता. हवेली. जि. पुणे) हा पारी कंपनीजवळ, नऱ्हे, पुणे येथे येणार आहे. सदर बातमीबाबत वरिष्ठांना माहिती देऊन त्यांच्या परवानगीने फौजदार शेख, पोलीस नाईक पाटोळे व पोलीस शिपाई दगडे यांना बातमीच्या ठिकाणी रवाना करून पाहिजे आरोपी मिळताच समक्ष हजर करणेबाबत आदेशित केले होते.


प्राप्त बातमीचे अनुषंगाने संबंधित ठिकाणी संशयित इसम येताच त्याची हालचाल संशयास्पद वाटल्याने त्यास शिताफीने सापळा रचून ताब्यात घेण्यात आले. राजू बाबूराव जावळकर यास पुढील चौकशीकामी दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-१, गुन्हे शाखा, पुणे शहरच्या कार्यालयात आणून दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने त्याच्याकडे अधिक चौकशी करता त्याचा दाखल गुन्ह्यातील सहभाग निष्पन्न झाल्याने त्यास पुढील कारवाईकरिता तोफखाना पोलीस स्टेशन, जि. अहमदनगर यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. दाखल गुन्ह्याचा पुढील तपास तोफखाना पोलीस करीत आहेत.

सदरची कारवाई ही, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) भाग्यश्री नवटक्के, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे (गुन्हे शाखा-२) यांच्या मार्गदर्शनाखाली दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शेवाळे, सहायक पोलीस फौजदार शाहिद शेख, पोलीस हवालदार नीलेश शिवतरे, पोलीस नाईक धनंजय ताजणे, गणेश पाटोळे, गणेश ढगे, मॅगी जाधव आणि पोलीस अंमलदार श्रीकांत दगडे, सुमीत ताकपेरे, दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-१ गुन्हे शाखा, पुणे शहर यांनी केली आहे.

get_footer();