आवृत्ती पुणे
← Back to Homepage

वाहनचोरीच्या 14 गुन्ह्यांचा छडा लावत 10 लाखाच्या मुद्देमालासह आरोपीला अटक

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • April 7, 2023

महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क

पुणे : हडपसर पोलिसांनी 14 वाहनचोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावला असून मुद्देमालासह आरोपीस ताब्यात घेतले आहे. परशुराम उर्फ परश्या मोरे असे या आरोपीचे नाव असून त्याचे वय 24 वर्ष आहे.

त्याच्याकडून 10 लाख रूपये किंमती मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यामध्ये 3 होंडा युनिकॉर्न, 2 अँक्टीव्हा, 2 पॅशन, 2 शाईन, 1 ज्युपीटर, 1 स्प्लेंडर, 1 प्लाटिना, 1 डिलक्स आणि 1 बुलेट अशा गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत.
सध्या पुरंदर जिल्ह्यात राहाणाऱ्या या आरोपीने हडपसर, भोसरी, लोणीकंद, विश्रामबाग, बारामती, विजापूर पोलिस स्टेशन सोलापूर, इंडी कर्नाटक आदि ठिकाणाहून वाहन चोरी केली आहे. तपास अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक विजय शिंदे, पोलिस उपनिरीक्षक अविनाश शिंदे, पोलिस अंमलदार प्रशांत दुधाळ, अनिरूद्ध सोनवणे, भगवान हंबर्डे, मनोज सुरवसे, अमोल दणके पेट्रोलिंग करत असताना या आरोपीला संशयास्पदरित्या दुचाकीसह पाहिले. कागदपत्रांबाबत समाधानकारक उत्तरे न दिल्याने त्यास तपासाकरता ताब्यात घेतले आणि त्यातून हे गुन्हे उघडकीस आले.
शहरात वाहन चोरीच्या गुन्ह्याचे वाढते प्रमाण पाहता हडपसर पोलिस ठाण्यातल्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत कारवाई करण्याबाबतच्या सूचना पोलिस उपायुक्त विक्रांत देशमुख यांनी काही दिवसांपुर्वी दिल्या होत्या.

get_footer();